आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी 'मुख्य'मंत्री आता झाले 'आम' आमदार !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : सत्ता आणि खुर्चीसोबत संदर्भच बदलत नाहीत तर मुक्कामाचे ठिकाणही बदलते. एकेकाळी हिवाळी अधिवेशनात 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी मुक्कामी असणारे माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार आदींचा मुक्काम आता आमदार निवासात राहणार आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे, तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना वडेट्टीवार रवी भवनात राहत होते. या सर्वांना आता आमदार निवासात खोल्या देण्यात आल्या आहेत.

राज्यात तूर्त सहाच मंत्री असल्याने रवी भवनमधील इतर बंगले मालकाची वाट पाहत आहेत. राज्यमंत्रीच नसल्याने 'नागभवन'चे वाटप झालेले नाही. तिथे बड्या नोकरशहांची व्यवस्था करून महसूल खाते वरिष्ठांना खुश करण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेही आमदार निवासात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांना नियमानुसार आमदार निवासातील खोली देण्यात आली आहे. मात्र, ते आमदार निवासात राहतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वडील मुख्यमंत्री असल्याने आदित्य ठाकरेही रामगिरीतच राहतील, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

रवी भवनात मंत्र्यांची निवासव्यवस्था

एकनाथ शिंदे : १
सुभाष देसाई : २
जयंत पाटील : ३
छगन भुजबळ : ४
बाळासाहेब थोरात : ५
नितीन राऊत : ६


रामराजे निंबाळकर : सभापती, विधान परिषद, १८
नाना पटोले : अध्यक्ष, विधानसभा : १७
नीलम गोऱ्हे : उपसभापती, विधान परिषद : २०
देवेंद्र फडणवीस : विरोधी पक्षनेते, विधानसभा २३

आमदार निवासात यांची व्यवस्था

पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांना आमदार निवासातील अनुक्रमे १०२ आणि ७ क्रमांकाची खोली देण्यात आली आहे. अजित पवार यांनाही खोली क्रमांक १०३ देण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटलांना १०१, रामदास कदमांना १०४, डॉ. परिणय फुकेंना १०५, विजय वडेट्टीवारांना ११०, राजेश टोपेंना ११८, रणजित कांबळेंना १२६, वर्षा गायकवाडांना २०१, गिरीश महाजनांना ४०६, राधाकृष्ण विखे पाटलांना २९, जितेंद्र आव्हाडांना २३८, तर अनिल देशमुखांना ४५३ क्रमांकाची खाेली देण्यात आली आहे. युतीच्या काळात चंद्रकांत पाटलांना देवगिरी बंगला होता. त्यांनाही आता आमदार निवासातील खोली मिळाली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...