आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former Chief Minister Narayan Rane's Statement, 'Maha Agdhadi' Government In The State Will Not Last For Even Two Months'

'राज्यातील महाआघाडीचे सरकार दोन महिनेही टिकणार नाही', माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा घणाघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर : राज्यातील महाआघाडीचे सरकार अल्पकालीन सरकार आहे. दोन महिनेही सरकार टिकणार नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी तुळजापूर येथे केली. त्यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात सहकुटुंब देवीची पूजा केली.

खासदार राणे यांनी शनिवार श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची यथासांग पूजा करून सहकुटुंब घेतले दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर मंदिर कार्यालयात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांच्या वतीने नारायण राणे व त्यांच्या पत्नी यांचा देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, सध्याचे सरकार शिवसेनेचे नसून राष्ट्रवादीचे आहे.

तसेच हे सरकार अल्पकालीन दिवसाचे राहणार आहे. आजच औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. तसेच अनेक शिवसेनेतील आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.''या मुख्यमंत्र्याला कुठलेही राजकीय ज्ञान नसून एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर तो थोरात किंवा जयंत पाटलांकडे पाहतो.

हा माणूस राज्याच्या जनतेसाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे.'' अशी टीका नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सरकार लवकरच गुंडाळणार आहे. आताचे सरकार येताना शिवसेनेने नीतिमत्ता सांभाळली नाही. प्रामाणिकपणे शिवसेनेने युती धर्म पाळला नाही.


त्यामुळे आताचे सरकार लवकरच गुंडाळणार आहे. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, अॅड. नितीन काळे, अॅड. अनिल काळे, गुलचंद व्यवहारे, विकास मलबा, विशाल छत्रे, नरसिंग बोधले, शाहुराज मगर, इंद्रजीत साळुंके, प्रसाद पानपुडे, सुहास साळुंके, सागर कदम, लक्ष्मण उळेकर, राम छत्रे, लखन छत्रे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.