आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल; काँग्रेस महाआघाडीला जनता साथ देईल - चव्हाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते - Divya Marathi
राड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते

कराड - कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (गुरुवारी) सकाळी दाखल केला. कराडमधील नूतन प्रशासकीय इमारतीत निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आ. बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, प्रदेश युवकचे सरचिटणीस शिवराज मोरे, इंद्रजीत चव्हाण, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, माजी अध्यक्ष प्रदिप जाधव, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवास थोरात, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, अल्पसंख्यांक काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, अॅड. प्रकाश चव्हाण, अॅड. अमित जाधव यांची यावेळी उपस्थिती होती. 
 
सकाळी आ. चव्हाण यांच्या पाटण कॉलनीतील निवासस्थानी चव्हाण कुटूंबियांनी त्यांना औक्षण केल्यानंतर ते अकरा वाजता अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय इमारतीकडे रवाना झाले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दिघे यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून समाजवादी, पुरोगामी विचारांची ठामपणे पाठराखण केली आहे. तेव्हापासून आजअखेर मतदारसंघातील जनतेने काँग्रेस विचाराच्या उमेदवारास साथ दिली आहे. जनता या मूळ विचारापासून कधीच बाजूला जाणार नाही. यंदाची निवडणूक विशिष्ठ परिस्थितीत होत आहे. देशात व राज्यात धर्मद्वेष, जातीयता या विचारांना घेवून समाज व विशेषतः तरुण पिढीच्या भवितव्याचे अतोनात नुकसान सुरु आहे. त्याचा परिणाम जाणवत असल्याने लोकांनी जे ठरवायचे ते ठरवले आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, राज्यात नक्कीच बहुजनवादी, समाजवादी व पुरोगामी विचारांच्या काँग्रेस महाआघाडीला जनता साथ देईल. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनता सूज्ञ आहे. कधीही जातीयवादी शक्तींना मतदारसंघात जनता थारा देणार नाही. मतदारसंघात काँग्रेसची रुजलेली पाळेमुळे या निवडणूकीत आणखी घट्ट होतील, असा मला ठाम विश्वास आहे.