आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Cricketer And BJP MP Gautam Gambhir Threatened To Kill Him Over Phone, Demanded Security

माजी क्रिकेटर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गौतम गंभीर यांनी डेप्युटी कमिश्नर पत्र लिहून कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी केली
  • पोलिस तक्रारीत सांगितल्यानुसार फोन आंतरराषट्रीय नंबरवरुन आला होता

नवी दिल्ली- भाजप खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांना अज्ञाताने फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गंभीर यांनी शहादराच्या डेप्युटी कमिश्नरांना पत्र लिहून एफआयआर दाखल केली आणि कुटुंबासाठी सुरक्षेची मागणीदेखील केली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गंभीर यांना आलेला फोन आंतरराषट्रीय नंबर +7 (400) 043 वरुन आला होता.मिळालेल्या माहितीनसुरा, 20 डिसेंबरला शाहदराच्या पोलिस उपायुक्तांना(DCP) दिलेल्या पत्रानुसार गौतम गंभीरने सांगितले की, शुक्रवारी त्यांच्या मोबाईलवर  +7 400 043 नंबरवरुन फोन करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्यानंतर गंभीरने आपल्या खासगी सुरक्षा रक्षकांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांना पत्र लिहून तक्रार दाखल केली. प्रकरणाला गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासात स्थानिक पोलिसांसोबतच सायबर सेलदेखील काम करत आहे. माध्यमांना बोलताना गंभीर म्हणाले की, फोन रशियातून आला होता, पण बोलणारा हिंदीमध्ये बोलत होता.

आंदोलनाला विरोध केल्यामुळे धमकी ?

असे बोलले जात आहे की, देशभरात होत असलेल्या हिंसक आंदोलनाला विरोध केल्यामुळे गंभीर यांना धमकी मिळाली असावी. याबाबत गंभीरला विचारल्यावर ते म्हणाले की, "मला यावर काहीच बोलायचे नाहीये. फक्त नागरिकांना शांत राहण्याची अपील करतो. हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, घेण्याचा नाही."