आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे निधन, भाजपमध्ये 'दिल्ली का शेर' म्हणून ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क, नवी दिल्ली - दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते मदनलाल खुराणा यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी कीर्तिनगर स्थित आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. मुलगा हरीश खुराणाने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. खुराणा मागच्या काही वर्षांपासून ब्रेन स्ट्रोकमुळे कोमात होते.,

 

- नुकतेच त्यांचा मोठा मुलगा विमल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. खुराणा हे भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. दिल्लीच्या राजकारणात ते दीर्घकाळ सक्रिय होते. 1993 ते 1996 पर्यंत ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले. खुराणांचा जन्म पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये 15 ऑक्टोबर 1936 रोजी झाला होता.

 

मोदींना हटवण्याची केली होती मागणी : 
मदनलाल खुराणा भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी होते. ते स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. याच कारणामऊहे खुराणांना भाजपमध्ये 'दिल्ली का शेर' म्हटले जायचे.
- बीबीसीमध्ये छापलेल्या वृत्तानुसार, 2005 मध्येही त्यांचे निर्भीड व्यक्तिमत्त्व पाहायला मिळाले, जेव्हा त्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदींना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. तथापि, त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागली होती. खुराणा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

 

राजस्थानच्या राज्यपाल पदाचा दिला राजीनामा
अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये खुराणा संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन मंत्रीही होते. 4 वेळे ते खासदार बनले. 2001 मध्ये त्यांना राजस्थानचे राज्यपाल बनवण्यात आले होते, परंतु जानेवारी 2004 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला. भाजप आमदारांच्या आग्रहावरून पुन्हा सक्रिय राजकारणात परतले. खुराणा दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही राहिले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...