Home | National | Delhi | former delhi cm sheila dixit cremation at nigambodh ghat

शीला दीक्षित पंचतत्वात विलीन, दिल्लीतील निगमबोध घाटावर राजकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 21, 2019, 04:28 PM IST

शीला दीक्षित यांच्या निधनामुळे केजरीवाल सरकारने दिल्लीत दोन दिवसीय राजकीय दुखवटा घोषित केला

 • former delhi cm sheila dixit cremation at nigambodh ghat

  नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर रविवारी दुपारी निगमबोध घाटावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथे सोनिया आणि प्रियांका गांधीसह काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


  शनिवारी दुपारी दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमद्ये कॉर्डियक अरेस्टमुळे दीक्षित यांचे निधन झाले होते. त्यांनी 15 वर्ष दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. शीला दीक्षित माझी मोठी बहिण आणि चांगली मैत्रीण होती. मला नेहमीच त्यांचे समर्थन मिळाले असे सोनिया गांधीं म्हणाल्या.

  पंतप्रधान मोदी - केजरीवाल यांनी वाहिली श्रद्धांजली
  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी संध्याकाळी निजामुद्दीन येथील दीक्षित यांच्या निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजसह अनेक नेते मंडळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते. दर दूसरीकडे केजरीवाल सरकारने दिल्लीत दोन दिवसीय राजकीय दुखवटा घोषित केला आहे.

  शीलाजी काँग्रेसची मुलगी होती - राहुल गांधी

  काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी म्हटल्या की, शीलाजींच्या निधनाने मी दुखी आहे. त्या काँग्रेसच्या एक मोठ्या नेत्या होत्या. दिल्ली आणि देशासाठीचे त्यांचे योगदान सर्वांच्या लक्षात राहील. तर शीलाजी या काँग्रेलच्या मुलगी असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

 • former delhi cm sheila dixit cremation at nigambodh ghat
 • former delhi cm sheila dixit cremation at nigambodh ghat
 • former delhi cm sheila dixit cremation at nigambodh ghat
 • former delhi cm sheila dixit cremation at nigambodh ghat
 • former delhi cm sheila dixit cremation at nigambodh ghat

Trending