आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी अर्थमंत्री अरुण जेटली अनंतात विलीन; राजकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार, मुलगा रोहनने दिला मुखाग्नी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी सव्वातीन वाजता दिल्लीतील निगमबोध घाटावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण जेटलींचे पुत्र रोहन यांनी मुखाग्नी दिला. तत्पूर्वी आज सकाळी ११ वाजता जेटली यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले होते. अंत्यविधीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, व्यंकया नायडू, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाबा रामदेव, माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरसह राजकीय नेते उपस्थित होते. अरुण जेटलींचे शनिवारी दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.


भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त सर डोमिनिक अॅस्क्विथ जेटलींच्या अंतयात्रेत सहभागी झाले होते. जेटली ब्रिटनमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी नेहमीच लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यसाठी काम केले असल्याचे सर डोमिनिक म्हणाले.
शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, लालकृष्ण आडवाणी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ, नवीन पटनायक, ज्योतिरादित्य सिंधिया, विजेंद्र गुप्ता, शाजिया इल्मी, शाहनवाज हुसैन, मनोज तिवारी, गौतम गंभीर, एस जयशंकर, डॉ.हर्षवर्धनसह अनेक नेत्यांनी जेटलींच्या निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना नऊ ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल
दीर्घकाळापासून आजारी असलेले अरुण जेटली (६६) यांचे शनिवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना नऊ ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी एम्समध्ये त्यांचे किडनी प्रत्यारोपण झाले होते. त्यानंतर काही महिन्यांनी ते राजकारणात सक्रिय झाले. मात्र त्यांना सॉफ्ट टिश्यू कर्करोग झाल्याचे समोर आले होते.  

परदेश दौरा रद्द न करण्याचे जेटली कुटुंबीयांनी मोदींना केले आवाहन
न देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी जेटली यांच्या पत्नी आणि मुलाचे फोनवरून सांत्वन केले. यावेळी जेटलींच्या पत्नी आणि मुलाने मोदींनी विदेश दौरा रद्द न करण्याचे आवाहन केले. यानंतर पंतप्रधान बहरीन येथील भारतीय समुदायाला संबोधित करताना भावुक झाले होते. ते म्हणाले की, मी तुमच्यासमोर एक दुःख मनात ठेवून उभा आहे. विद्यार्थीदशेपासून आम्ही सोबत होतो. मी इतक्या दूर आहे आणि माझा मित्र मला सोडून गेला याची कल्पना देखील करवत नाही. माझ्या मनात एकीकडे कर्तव्य तर दूसरीकडे मैत्रीच्या भावना आहे. मी मित्र अरुणला बहरीन येथून श्रद्धांजली वाहतो.