आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, आणीबाणीत १९ महिने तिहार तुरुंगात; २८ वर्षे भाजपच्या केंद्रीय राजकारणामध्ये केंद्रस्थानी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपण | कुटुंब लाहाेरमधून दिल्लीत, वडील वकील, आईकडून सेवाभाव आला
> जन्म २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. वडील महाराज किशन जेटली वकील हाेते. तेव्हा नवी दिल्लीच्या नरैना विहारमध्ये राहायचे. आई रत्नप्रभा गृहिणी हाेत्या. समाजसेवाही करत. सेवाभावाची शिकवण त्यांना आईकडून मिळाली. दाेन थाेरल्या बहिणी आहेत. आई-वडील लाहोरमधून दिल्लीत स्थायिक झाले हाेते. दिल्लीच्या सेंट झेव्हियर स्कूलमध्ये शिक्षण झाले. १९६९ मध्ये श्रीराम काॅलेज आॅफ काॅमर्समधून पदवी संपादन केली. १९७७ मध्ये ते दिल्ली विद्यापीठात विधी पदवीधर. 

तरुणावस्था : विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, आणीबाणीत १९ महिने तिहार तुरुंगात
>१९७४ मध्ये दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदावर निवडून आले. १९७५ मध्ये आणीबाणीच्या विराेधातील निदर्शनांदरम्यान अटक. त्यानंतर १९ महिने तिहार तुरुंगात ठेवले. १९७९ मध्ये त्यांचा विवाह संगीता डोगरा यांच्याशी झाला. काँग्रेसचे दिग्गज नेते गिरधारी लाल डोगरा यांच्या त्या कन्या होत. ते दोनवेळा जम्मूचे खासदार राहिले होते. जेटलींच्या विवाहाला अटलजी, अडवाणी, इंदिरा गांधी यांची उपस्थिती होती. 

सक्रिय राजकारण : ३ वेळा राज्यसभा खसदार, मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री 
> १९९१ मध्ये पहिल्यांदा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी झाले. १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती व प्रसारण मंत्री स्वतंत्र प्रभार होते. २००० मध्ये राज्यसभा खासदार व कायदा मंत्री झाले. २००६ मध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये राज्यसभेत विरोधी पक्ष नेते झाले. त्यासाठी वकिली सोडली. २०१२ मध्ये तिसऱ्यांदा राज्यसभेवर सदस्य. २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये अर्थ, संरक्षण खाते.