• Home
  • National
  • former finance minister to be produce in court over inx media case

INX Case / माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना सीबीआय गेस्ट हाउसमध्ये काढावी लागली रात्र; आज कोर्टात करणार हजर

पी. चिदंबरम यांना 95 मिनिटांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली होती अटक 
 

Aug 22,2019 02:50:12 PM IST


नवी दिल्ली - सीबीआयने आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक केली. यानंतर सीबीआयचे अधिकारी अर्थमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानाहून सीबीआय मुख्यालयात घेऊन गेले. चिदंबरम यांना रात्रभर सीबीआय मुख्यालयात ठेवण्यात आले. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. सीबीआय रिमांडची मागणी करू शकते.

याअगोदर चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली होती. परिषदेनंतर ते जोरबाग येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले होते. सीबीआयचे पथक देखील त्यांच्या पाठोपाठ तेथे दाखल झाले होते. काही वेळ गेट वाजवल्यानंतर सीबीआय पथकाने भिंतीवरून उड्या मारून घरात प्रवेश केला. दरम्यान सीबीआयच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, चिदंबरम यांना कोर्टाच्या अटक वॉरंटच्या आधारावरच अटक करण्यात आली आहे. अटत केल्यानंतर चिदंबरम यांना वैद्यकीय तपासणीसाठी राम मनोहर लोहिया रुग्णलयात नेण्यात आले. चिदंबरम यांनी सीबीआय मुख्यालयातील अतिथी गृहाच्या सुइट नंबर 5 मध्ये ठेवण्यात आल्याचे सु्त्रांनी सांगितले. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

X