Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Former Gram Panchayat member suicides in chopda

'टोकरे कोळी' प्रमाणपत्र मिळेना; माजी ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 10:04 AM IST

मुलास टोकरे कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने तालुक्यातील वेले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश एकनाथ कोळी (व

  • Former Gram Panchayat member suicides in chopda

    चोपडा- मुलास टोकरे कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने तालुक्यातील वेले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश एकनाथ कोळी (वय ४२) यांनी गुरूवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अात्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याचा उल्लेख आहे.


    सुरेश कोळी हे मागील अनेक दिवसांपासून मुलाच्या शिक्षणासाठी टोकरे कोळी जात वैधतता प्रमाणपत्र मिळावे म्हणून प्रयत्न करत असताना त्यांना ते मिळत नव्हते. त्यांचा मुलगा इयत्ता आठवी आणि मुलगी पाचवीमध्ये चोपड्यात शिक्षण घेत आहेत. कोळी यांनी गुरूवारी दुपारी ३ वाजेपुर्वी राहत्या घरी छताचा लोखंडी हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी शीलाबाई काेळी या चाेपडा नगरपालिका रूग्णालयात अाशा वर्कर म्हणून काम पाहतात. त्या अाठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी भालाेद येथे गेलेल्या हाेत्या. चोपडा शहर पोलिस ठाण्यात पोलिस पाटील नीलकंठ कंखरे यांच्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


    मुलांचे भवितव्य खराब होत आहे
    मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे आणि माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी टोकरे कोळी सर्टिफिकेट व व्हॅलिडीटी मिळत नाही, त्याचे भवितव्य खराब होत आहे, त्यांच्यामुळे शिष्यवृत्ती मिळत नाही. माझ्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, सरकार शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे. शिक्षणाला फार खर्च येतो. त्यामुळे आई वडील परेशान होतात व आत्महत्या कराव्या लागतात, जेणे करून शिक्षण समितीने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा अजून फार पालकांना आत्महत्या कराव्या लागतील असे सुरेश कोळी यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

Trending