आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी : हिंदू समाज पक्षाच्या नेत्याची कार्यालयात घुसून हत्या, तणाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत शुक्रवारी हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची त्यांच्या कार्यालयात घुसून दोन गुंडांनी हत्या केली. मारेकऱ्यांनी आधी गोळी घातली व नंतर चाकूने गळा चिरला. दोन्ही आरोपींनी मिठाईच्या बॉक्समध्ये रिव्हॉल्व्हर, गावठी पिस्तूल आणि चाकू लपवून आणला होता. एकाने भगवे कपडे घातले होते. बोलत असताना बॉक्समधून रिव्हॉल्व्हर, गावठी पिस्तूल आणि चाकू काढला. त्यांच्या गळ्यावर चाकूने १५ पेक्षा जास्त वार केले आणि पळून गेले. जखमी कमलेश यांना लखनऊतील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. प्रेषितांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने बिजनौरचे इमाम मौलाना अनवारूल हक यांनी २०१५ मध्ये कमलेश तिवारी यांचा गळा चिरणाऱ्यास ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तिवारी यांच्या पत्नीने मौलानाविरोधात तक्रार दाखल केली होती. कमलेशवरही रासुकाचा गुन्हा दाखल होता. नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तो रद्द केला.

सुरक्षेत कुचराई : कमलेश यांचे कार्यालय खुर्शीदबाग परिसरात आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात होते. मात्र, घटनास्थळावर एक जण आला नव्हता तर दुसरा झोपला होता. कार्यालयात काम करणाऱ्या संतोष सिंहने सांगितले की, हत्येच्या आधी कमलेशबरोबर बोलताना ते आरोपी हिंदू मुलगा व मुसलमान मुलीच्या लग्नाची चर्चा करत होते.

बातम्या आणखी आहेत...