आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former ICICI Bank MD Chanda Kochhar And Husband Deepak Kochhar's Estate Is In Danger

आयसीआईसीआय बँकेची माजी एमडी चंदा कोचरसह पती दीपक कोचर यांच्या संपत्तीवर टाच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : व्हिडिओकॉन कंपनीला स्वतःचे हितसंबंध जपत मोठे कर्ज मंजूर केल्याचा ठपका असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली. कोचर यांचे मुंबईस्थित निवासस्थान व पती दीपक कोचर यांच्या कंपनीची काही मालमत्ता जप्त करण्यात आली. याची एकूण किंमत ७८ कोटी आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी ही कारवाई झाली. पती दीपक कोचर यांना फायदा व्हावा या हेतूने व्हिडिओकॉन कंपनीवर मेहरनजर दाखवत मोठे कर्ज मंजूर करण्यात आल्याच्या आरोपावरून चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...