आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा काँग्रेसला रामराम; मल्लिकाअर्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकापाठोपाठ मोठे धक्के बसत आहेत. मंगळवारी (दि10) दुपारी उर्मिला मातोंडकरने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संध्याकाळी माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकाअर्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्याच्या बहाण्याने पोहोचले होते. तेव्हापासून ते काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या . 
 

इंदिरा गांधींकडून मिळाली सक्रिय राजकारणात येण्याची प्रेरणा 
कृपा शंकर सिंह यांना त्यांच्या कुटुंबियांकडून राजकीय कौशल्ये मिळाली आहेत. त्यांचे वडील जौनपूरमध्ये एक स्वातंत्र्य सैनिक होते. मुंबईत आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी झोपडपट्ट्यांच्या समस्यांसाठी आवाज उठविला आणि स्थानिक पातळीवर काम करण्यास सुरवात केली. काही वर्षांनंतर कृपाशंकर सिंह यांनी एका कार्यक्रमादरम्यान माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्या सांगण्यावरून सक्रिय राजकारणात उतरले.
 

बातम्या आणखी आहेत...