आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री धोत्रे यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री वसंतराव रामराव धोत्रे (८१) यांचे शुक्रवारी सायंकाळी अाजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली असा परिवार अाहे. भाजप खासदार संजय धाेत्रे यांचे ते चुलतबंधू हाेते. 


अकोला तालुक्यातील पळसो बढे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वसंतरावांनी सहकार क्षेत्रासाठी जीवन वेचले. १९६० सालापासून धोत्रे यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष, जि. प. सदस्य म्हणून निवडून आले. बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघाचे १९८५ ते १९९० पर्यंत त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्या काळात २ वर्षे त्यांनी सहकार व वने राज्यमंत्री होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...