आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जातिवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : पानटपरी चालकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात माजी आमदार तथा मनसेचे जिल्हाप्रमुख हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अभिनंदन पाटंगणकर यांनी फेटाळला. त्यामुळे जाधव यांना काेणत्याही क्षणी अाता अटक हाेऊ शकते.

पानटपरीचालक नितीन रतन दाभाडे (३०, रा. बनेवाडी) यांनी जाधव यांच्याविराेधात तक्रार दिली होती. त्यानुसार, दाभाडे यांनी अाैरंगाबादेत जिल्हा न्यायालयासमोरील सिग्नलजवळ पानटपरी सुरू केली व तेथे झेंडा लावला. २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हर्षवर्धन जाधव तेथे आले. त्यांनी टपरीची जागा माझ्या मालकीची आहे. त्यामुळे टपरी व झेंडा हटव, असे दाभाडे यांना सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. जाधव यांनी मला जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच टपरी व झेंडा हटवला नाही तर, जिवे मारीन अशी धमकी दिल्याचे दाभाडे यांनी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर रविवारी रात्री दाभाडे यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून जाधव यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
 

बातम्या आणखी आहेत...