आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिय्या अांदाेलनातील गाेंधळ मॅनेज; मराठाबाह्य तरुणांनीच रचला कट ; काेकाटे यांचा अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ठिय्या अांदाेलनात गाेंधळ घालणारे तरुण मराठा समाजाचे नव्हतेच; काेणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी अांदाेलनाला गालबाेट लावण्याचा कट रचल्याचा दावा माजी अामदार माणिक काेकाटे यांनी पत्रकार परिषदेत केला. हा गाेंधळ मॅनेज असून या तरुणांचे फुटेज अामच्याकडे अाहे. त्याप्रमाणे पाेलिसांनी संबंधितांचा शाेध घेऊन गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 
जुना गंगापूरनाका परिसरात गुरुवारी (दि. ९) झालेल्या ठिय्या अांदाेलनात दगड अाणि चप्पलफेक झाल्यानंतर काेकाटे यांनी पत्रकार परिषद घेत घडल्या प्रकाराविषयी भाष्य केले. अांदाेलनात गाेंधळ घालणारे तरुण काेणाच्याही अाेळखीचे नव्हते, असे सांगत काेकाटे म्हणाले की, राजकीय पुढारी, पक्ष अाणि वेगवेगळ्या जाती- जमातींच्या बाबतीत शिवराळ भाषेचा वापर करीत ही मंडळी उपस्थित अांदाेलकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत हाेती. हे मराठा समाजाचे व्यासपीठ असून येथे शिस्त अाणि संयमानेच भाषणे हाेतील, अशी भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न करीत असताना काही असमंजस तरुण मुले अांदाेलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत हाेते. त्यांचा अावेश बघता ते काेणाच्या तरी सांगण्यावरून असे कृत्य करीत असल्याचे लक्षात अाल्यावर मी धावून जात शिवराळ भाषा वापरू नका असे अावाहन केले. त्यावेळी गाेंधळ घालत या तरुणांनी दगड फेकले. मात्र यात अापल्याला दगड लागला नसून साेशल मीडियावर मी जखमी झाल्याची अफवा पसरविण्यात अाली. माझ्या कार्यकर्त्यांनी मला तातडीने अांदाेलन स्थळाच्या बाहेर नेले. दगडफेक करुन दहा बारा तरुण तातडीने पळून गेले. त्यातील एकाला अांदाेलकांनी पकडून चाेपही दिला. त्यानंतर शहरात अफवा पसरून बंद करण्यासाठी अन्य तरुण पुढे अाले, असेही काेकाटे यांनी सांगितले. 


पत्रकार परिषदेस मराठा क्रांती माेर्चाचे प्रमुख सुनील बागूल, महापालिकेचे विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बडवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक तुषार जगताप, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, माजी नगरसेवक सुरेश पाटील अादी उपस्थित हाेते. 


दिशाहिन, नेतृत्वहिन अांदाेलनामुळे नुकसानच 
दिशाहिन अाणि नेतृत्वहिन अांदाेलनामुळे समाजाचे नुकसानच हाेईल, असे यावेळी काेकाटे यांनी नमूद केले. अारक्षण देण्याची चिठ्ठी काेणी खिशात घेऊन फिरत नसते. त्यामुळे अामदार, खासदारांना टार्गेट करणे थांबविले पाहिजे. राजकारण हे राजकारणाच्या जागेवर असून अांदाेलनाला पक्षीय रंग देऊ नये, असे अावाहनही त्यांनी केले. 


अांदाेलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी अाज बैठक 
मराठा समाजाच्या वतीने डाेंगरे वसतिगृह मैदानावर अारक्षण मिळेपर्यंत गावनिहाय ठिय्या अांदाेलन घेण्याचे नियाेजन हाेते. परंतु गुरुवारी झालेला प्रकार बघता शुक्रवारी (दि. १०) समाजातील ज्येष्ठांची पुन्हा एक बैठक हाेईल अाणि त्यात अांदाेलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...