आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेल्हापूर/ मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा हातकणंले (जि. काेल्हापूर) येथील माजी खासदार निवेदिता माने यांनी बुधवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यापाठाेपाठ त्यांचे पुत्र धैर्यशील यांनीही पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांची ‘माताेश्री’वर जाऊन भेट घेत त्यांच्या हाताने शिवबंधनही बांधून घेतले.
निवेदिता माने यांनी अद्याप पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली नसली तरी त्याही शिवसेनेतच दाखल हाेतील, असा तर्क लावला जात अाहे. लाेकसभा निवडणुकीत धैर्यशील माने हे हातकणंगलेतून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार अाहेत. येथून सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी खासदार अाहेत. गेल्या वेळी शिवसेना- भाजप महायुतीकडून शेट्टी निवडून अाले हाेते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भाजपशी फारकत घेत शेट्टी ‘एनडीए’तून बाहेर पडले अाहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अलीकडच्या काळात त्यांची जवळीक वाढल्याने अागामी लाेकसभा निवडणुकीत राजू शेट्टी हे हातकणंगलेमधून अाघाडीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवली जात अाहे.
त्यामुळे अाधी पक्षात दुर्लक्षित असलेल्या माने गटाचा पत्ता अापसुकच साफ हाेणार अाहे. या कारणामुळे काही दिवसांपासून निवेदिता माने व त्यांचे समर्थक पक्षावर नाराज हाेते. शरद पवार यांनी अलीकडेच काेल्हापूर जिल्ह्याचा दाैरा केला, त्या वेळीही माने यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून काहीही प्रयत्न झाले नाहीत. यामुळे नाराज असलेल्या निवेदिता माने यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला व त्यांचे पुत्र शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे अागामी लाेकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शेतकरी नेते राजू शेट्टी व माने यांच्यातील लढत चुरशीची हाेणार यात शंका नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.