आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला मुंबईत खिंडार, पक्षावर नाराज असलेल्या संजय निरुपम यांनी प्रचार न करण्याचा घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पक्षातील दिग्गज नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. "पक्ष नेतृत्वाचे जे माझ्यासोबत वागणे आहे, ते योग्य नसून आता जास्त काळ सहन होणार नाही. त्यामुळे पक्षाचा निरोप घेण्याची वेळ आलीये." असे ट्विट त्यांनी केल्याने ते पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे बोलले जात आहे.

संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीसाठी मी फक्त एक नाव सुचवलं होतं आणि पक्षाने ते नाकारलं आहे. हे अतिशय चूकीचं असून मी पक्षाच्या प्रचारातही सहभागी होणार नाही." ऐन निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने बंड पुकारल्याने काँग्रेसला चांगलाच हादरा बसला आहे.