आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का, मुंबईतील माजी खासदाराने घेतला शिवसेनेत प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. 
संजय दिना पाटील 2009 ला लोकसभेत ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये भाजपच्या किरीट सोमय्यांनी त्यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या मनोज कोटक यांनी त्यांचा पराभव केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भांडुप, मुलुंड अशा भागात मनसेचे प्राबल्य असल्यामुळे संजय दिना पाटील यांच्या सेनाप्रवेशाने पक्षाला फायदा होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...