आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former NCP State President Bhaskar Jadhav Meets Shiv Sena Chief Uddhav Thackeray, Might Join Shivsena Soon

राष्ट्रवादीची गळती सुरुच; माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेचीं भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे कबुल केले आहे. तसेच त्यांच्याकडून शिवसेना प्रवेशाचा प्रस्ताव आल्याची कबुलीही दिली आहे. कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

"होय, माझी आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले आहे. पण याविषयी कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे." असे भास्कर जाधवांनी स्पष्ट केले. जाधव यांनी प्रस्ताव मान्य केल्यास 15 वर्षांनंतर ते शिवसेनेत त्यांची घरवापसी होईल. 
 
सुरुवातीला, आपण कोणाचीही भेट घेतलेली नाही, शिवसेना प्रवेश या फक्त अफवा आहेत, असा दावा करणाऱ्या भास्कर जाधवांनी अखेर शिवसेनेचा भगवा पुन्हा हाती धरण्याचे संकेत दिले आहेत. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर राष्ट्रवादीच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

भास्कर जाधवांचा परिचय
1982 मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून राजकारणात आले. 1995 ते 2004 या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदंही भूषवले. 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.
आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नऊ खाती सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांना सोपवण्यात आले. 
 

बातम्या आणखी आहेत...