आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former Opener Nasir Jamshed Accepts Fixing Charges, Will Be Sentenced In February

माजी ओपनर नासिर जमशेदने फिक्सिंगचे आरोप स्विकारले, फेब्रुवारीमध्ये होईल शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 33 वर्षीय जमशेद मॅच फिक्सिंग करण्यासाठी लाच देण्याच्या कटात सामील होता
  • फिक्सर यूसुफ अनवर आणि मोहम्मद एजाजने ट्रायलपूर्वीच लाच दिल्याचे कबुल केले

स्पोर्ट डेस्क- पाकिस्तानचा माजी ओपनर नासिर जमशेद(33)ने एका टी-20 सामन्यात फिक्सिंगमध्ये सामील असल्याचे कबुल केले आहे. प्रकरण पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) शी संबंधित आहे. जमशेदने सुरुवातील आरोपांचे खंडन केले होते, पण इंग्लँडच्या मॅनचेस्टरमध्ये सोमवारी झालेल्या सुनावनी दरम्यान फिक्सिंग केल्याचे कबुल केले. फिक्सर यूसुफ अनवर (36) आमि मोहम्मद एजाज (34) यांनी याआधीच लाच घेतल्याचे कबुल केले होते. याप्रकरणी फेब्रुवारी 2020 मध्ये शिक्षा सुनावली जाणार आहे.सुनावनीपूर्वी वकील एंड्रयू थॉमस म्हणाले की, "एक अंडरकवर पोलिस अधिकाऱ्याने स्वतः फिक्सिंग टोळीचा सदस्य बनून स्‍पॉट फिक्सिंगच्या नेटवर्कमध्ये आपली जागा बनवली. त्याने 2016 मध्ये बांग्‍लादेश प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा प्रयत्न आणि फेब्रुवारी 2017 मध्ये पाकिस्‍तान सुपर लीगमध्ये फिक्सिंग झाल्याचा खुलासा केला. दोन्ही प्रकरणात टी-20 टूर्नामेंटमध्ये एका ओपनरने पैसे घेऊन ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रन न काढण्याचे ठरवले होते."

शार्जीलने पहिल्या दोन चेंडूवर रन काढले नाही
 
बांग्‍लादेशमध्ये दोन चेंडूवर रन न काढण्याच्या प्‍लॅनमध्ये फिक्सरच्या निशाण्यावर जमशेद होता. नंतर तो यात स्वतः सामील झाला. त्याने पाकिस्‍तान सुपर लीगमध्ये इस्‍लामाबाद यूनाइटेड आणि पेशावर जाल्‍मीदरम्यान इतर खेळाडूंना स्‍पॉट फिक्सिंगसाठी प्रवृत्त केले. पदाधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाली, पण त्यांनी सांमना पूर्ण होऊ दिला. सामन्यात पहिल्या दोन चेंडूवर रन काढले नव्हते.

मागच्या वर्षी जमशेदवर 10 वर्षांसाठी बंदी घातली होती
 
यापूर्वी ऑगस्ट 2018 भ्रष्टाचार विरोधी स्वतंत्र ट्रिब्यूनलने जमशेदला 10 वर्षांची बंदी घातली होती. नासिरवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)च्या भ्रष्टाचार विरोधी कलमाअंतर्गत आरोप लावले होते. यातून ट्रिब्यूनलने नासिरला पाचमध्ये दोषी आढळले. त्याने अनेकवेळा नियामांचे उल्लंघन केले. 2017 च्या सुरुवातील क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाल्यानंतर जमशेद पीसीबीच्या रडारवर होता. त्याला फेब्रुवारी, 2017 मध्ये ब्रिटेनमध्ये अटक करण्यात आले.