आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बुकीने मॅच फिक्सिंगची ऑफर दिली होती, मी त्याला रुममध्ये बंद करुन बेदम मारले होते'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरने मैच फिक्सिंगवर अजून एक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, एकदा त्याला एका बुकीने मॅच फिक्स करण्याबाबत विचारणा केली होती. त्याबदल्यात शोएबला 10 लाख डॉलर, दोन एस-क्लास मर्सडीज कार आणि लंडनच्या फुलहाममध्ये एक फ्लॅट देण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर शोएबने त्या बुकीला एका रूममध्ये नेऊन बेदम मारले होते.



शोएबने 2010 च्या एका घटनेबाबत बोलताना सांगितले की, पाकिस्तान टीम मॅच फिक्सिंगमध्ये अडकली होती. मैदानावर त्याच्या समोर 21 खेळाडू असायचे. 10 पाकिस्तान टीमचे आणि 11 विरोधी टीमचे. दोन दिवसांपूर्वी एका टॉक शोमध्ये बोलत असताना त्याने हा खुलासा केला. 



‘इंग्लंड दौऱ्यावर मिळाली होती ऑफर’
 
शोएबने सांगितले की, "मी पाकिस्तान टीमसोबत इंग्लंड दौऱ्यावर होते. तेव्हा एक बुकी माझ्या रूममध्ये आला. त्याने मला मॅच फिक्सिंगची ऑफर दिली. त्यानंतर मी त्याला रूममध्येच बेदम मारले होते."  



‘आमचे खेळाडू देशाचा घात करत आहेत’
 
पाकिस्तानी खेळाडूंवर नेहमीच मॅच किंवा स्पॉट फिक्सिंगचे आरोप लागत आले आहेत. याबाबत शोएब म्हणाले की, “मी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देत आहे. मोहम्मद आसिफने मला सांगितले की, त्याने किती आणि कोणासोबत मॅच फिक्स केले आहेत. आमिरनेही हेच केले. मी तर त्या दोघांना मारायला गेलो होतो. मॅच फिक्स करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंनी देशाचा घात केला आहे. त्यांनी गुन्हा केला आहे."




अनेकवेळा पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप लागत आले आहेत. पाकिस्तानी फिक्सर्सची लिस्ट मोठी आहे, पण यात काही अग्रेसर नाव म्हणजे, सलीम मलिक, मोहम्मद आसिफ, सलमान बट, शर्जील खान आणि मोहम्मद आमिर यांचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...