आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात कैद आहेत. पाकिस्तानचे सर्वात धनाढ्य पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे शरीफ यांचा थाट जेलमध्ये सुद्धा संपलेला नाही. त्यांनी तुरुंगात स्वतःला स्पेशल ट्रीटमेंट मिळवण्यासाठी भरपूर सुविधा करून ठेवलेल्या आहेत. तुरुंगात त्यांच्या मनोरंजनासाठी टीव्ही, थंडीपासून वाचण्यासाठी हीटर आणि बसण्याची खुर्ची देण्यात आली आहे. तरीही माजी पीएम एवढ्यात समाधानी नाहीत. त्यांनी तुरुंगात खासगी नोकराची डिमांड केली. एक कैदी त्यांच्या सेवेसाठी नेमण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
स्वतःच करावी लागेल सफाई
तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंड मिळवण्यासाठी नवाज शरीफांनी तुरुंग प्रशासनाकडे मागणी केली. मागण्या मान्य झाल्या नाही तेव्हा त्यांनी पंजाब प्रांत सरकारला विनंती केली. परंतु, राज्य सरकारने त्यांची ही मागणी स्पष्टपणे धुडकावून लावली आहे. तुरुंगात कुठलाही कैदी तुमच्या सेवेसाठी लावता येणार नाही. शरीफांना त्यांच्या सेलची साफ-सफाई स्वतः करावी लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय म्हणाले तुरुंग जेलर..?
लाहोरच्या कोट लखपत तुरुंगाचे महानिरीक्षक शाहिद सलीम बेग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शरीफांना अल-आजिजिया स्टील मिल्स आणि हिल मेटल कंपनीच्या भ्रष्टाचार प्रकरणात 24 डिसेंबर रोजी 7 वर्षांची कैद झाली. सश्रम कारावास अंतर्गत प्रत्येक कैद्याला काही काम दिले जाते. शरीफांना आता स्वतःची खोली साफ करावी लागेल. एकेकाळी तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ यांचे नाव पनामा पेपर्स स्कॅन्डलमध्ये सर्वप्रथम समोर आले. यात त्यांना आपले पंतप्रधान पद गमवावे लागले. सोबत, तुरुंगवास देखील झाला. शरीफ यांच्या तुरुंगवासाचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे, त्यांना जेलमध्ये टीव्ही, खुर्ची, टेबल आणि हीटरसह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांना आपल्या बॅरकमधून बाहेर जाण्याचीही परवानगी नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.