आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former Prime Minister Rajiv Gandhi Assassination Case: Nalini Got Parole For Daughters Marriage

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरण: जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनीला मुलीच्या विवाहासाठी महिन्याचा पॅरोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - मद्रास उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनीला मुलीच्या विवाहासाठी एक महिन्याचा पॅरोल मंजूर केला आहे. न्यायालयात मुलीच्या विवाहासाठी सहा महिन्यांची सुटी देण्याची मागणी करताना ती भावनिक झाली होती. 


नलिनी म्हणाली, माझा पतीही तुरुंगात आहे. मुलीचा जन्मही तुरुंगात झाला होता. तिचे पालन-पोषण कुटुंबातील बुजुर्गांनी केले. आता तिच्या विवाहाच्या तयारीसाठी कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी हवा. मला आतापर्यंत तीन वेळा पॅरोल मिळाला आहे. गेल्या वेळी वडिलांच्या मृत्यूनंतर पॅरोल मिळाला होता. त्यासाठी राज्य सरकारने प्रतिदिवसासाठी १६ हजार ३०० रुपये एवढी भरपाई दिली होती. त्यावर न्यायमूर्ती एमएम सुंदरेश व एम. निर्मल कुमार यांच्या पीठाने तिला एक महिन्याचा पॅरोल देण्यात येत असून राज्य सरकारने पॅरोलची ही प्रक्रिया दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. नलिनी २७ वर्षांपासून वेल्लोरमध्ये महिला कैद्यांसाठी बनवलेल्या तुरुंगात कैद आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी चेन्नईपासून सुमारे ४० किमी अंतरावरील श्रीपेरम्बदूर येथे प्रचार सभेत आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या झाली होती. नलिनीशिवाय तिचा पती मुरुगनसह इतर सहा जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. 


नेत्याच्या भेटीस मज्जाव
उच्च न्यायालयाने नलिनीला पॅरोलवर असताना नेत्याच्या भेटीस मज्जाव केला. कैद्यांसाठी तुरुंगातून एक महिन्याहून जास्त कालावधीचा सुटी देण्याचा काहीही नियम नाही, असे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...