आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या चित्रपटाचे खुपच शौकीन होते अटलजी, हेमा यांचा सीता और गीता पाहिला होता 25 वेळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे शुक्रवारी निधन झाले. एम्सने एक बुलेटिन सादर करुन याची माहिती दिली. यानुसार, अटलजी यांनी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. अटलजी गेल्या 9 आठवड्यांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते. तर 24 तासांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. 93 वर्षांचे अटल बिहारी वाजपेयी 2009 पासून व्हील चेअरवर होते. अटलजी एक असे व्यक्तीमत्त्व होते. जे निवडणुका हारल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी जायचे. 9 वर्षे अटलजी हे आजारपणात होते. त्यांना जुने चित्रपट खुप आवडायचे आणि ते टीव्हीवर लावण्यात येणारे जुने चित्रपट नेहमीच पाहायचे.

 

हे तीन चित्रपट खुप आवडायचे 
यामध्ये दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांचा 1955 मध्ये आलेला देवदास, 1963 मध्ये आलेला अशोक कुमार, नूतन आणि धर्मेंद्र यांचा बंदिनी, यासोबतच 1966 मध्ये आलेला राजकपूर आणि वहीदा रहमान यांचा तीसरी कसम या चित्रपटांचा समावेश आहे. ते हॉलिवूड चित्रपटही पाहायचे. यामध्ये त्यांना ब्रिज ओवर रिवर कवाई, बोर्न फ्री आणि गांधी हे चित्रपट खुप आवडायचे. 

 

आवडते कलाकार 
अटलजी यांना दिलीप कुमार, संजीव कुमार खुप आवडायचे. तर अभिनेत्रींमध्ये नूतन, राखी गुलजार आणि हेमा मालिनी यांचे ते चाहते होते. हेमा यांचा सीता और गीता त्यांनी 25 वेळा पाहिला होता. 


लता-मुकेश आणि रफी यांचे गाणे 
अटलजी यांना एस.डी बर्मन यांनी गायलेले मांझी हे गाणे खुप आवडायचे. परंतू त्यांना लता मंगेशकर, मुकेश आणि मोहम्मद रफी यांचे गाणे ऐकायला आवडचे. मुकेश आणि लता यांच्या आवाजातील 'कभी कभी मेरे दिल मे' हे त्यांचे आवडतीचे गाणे होते. 

 

बातम्या आणखी आहेत...