आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी कसोटी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे निधन; सचिनला १४ व्या वर्षी दिली संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ पाठक

औरंगाबाद - भारतीय क्रिकेट संघाच्या कसाेटीच्या काळात मुंुबईचे तत्कालीन युवा फलंदाज माधव आपटे यांनी विंडीजचा दाैरा गाजवला. पाेर्ट आॅफ स्पेनमध्ये विंडीज संघाविरुद्ध ५ कसाेटी सामन्यांची मालिका या फलंदाजाने सलामीवीराच्या भूमिकेत  गाजवली. त्यामुळे १९५३ मधील भारताचा विंडीजचा हा दाैरा माधव आपटे यांच्या नावे राहिला.  सलामीवीर फलंदाजाची भूमिका यशस्वीपणे बजावणाऱ्या माधव आपटे यांचा प्रशासनातही माेठा दबदबा राहिला. उत्तम सहकार्य व प्रचंड शिस्तबद्धपणा असणारा प्रशासक म्हणूनच त्यांनी कारकीर्द गाजवली.  त्यामुळेच सीआयसी,बीसीसीआय व सीएलसीमधील  त्यांचे सदस्यत्व प्रभावी ठरले.   अष्टपैलु खेळाडू माधव आपटे (८६)  यांनी साेमवारी मुंबई येथील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.  त्यांनी विंडीजविरुद्ध कसाेटी मालिकेत सलामीवीर म्हणून एका सिरीजमध्ये सर्वाधिक ४६० धावा काढण्याचा पराक्रम गाजवला.  

शिस्तीमुळे अधिक लाेकप्रिय : किरण माेरे
भारतीय संघातील शिस्तप्रिय खेळाडू म्हणूनच माधव आपटे यांची लाेकप्रियता सातत्याने कायम राहिली. सीनियर खेळाडूंमधील हे गुण आम्हा ज्युनियर युवांसाठी नेहमीच आदर्शच राहिले. त्यांचा प्रशासनातही  माेठा दबदबा हाेता.  गाजवलेला विंडीजचा दाैराही त्यांच्यातील कुशल खेळी सिद्ध करणारा आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक किरण माेरे यांनी दिली. 

महाराष्ट्राच्या क्रिकेटला नवी आेळख : चंदू बाेर्डे
माधव आपटे यांच्यामुळे  महाराष्ट्रीयन क्रिकेटला आेळख मिळाली. त्यांची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील साैराष्ट्राविरुद्धची झंझावाती खेळी लक्षवेधी ठरली. त्यामुळे त्यांना भारतीय कसाेटी संघात स्थान मिळवता आले. ही संधी सार्थकी लावताना त्यांनी १९५३ मधील विंडीजचा दाैरा गाजवला. त्यानंतर त्यांनी युवांमधील काैशल्याला चालना देण्याचे धाेरण राबवले. त्यामुळेच  सीआयसीमधील त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरली, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू चंदू बाेर्डे यांनी दिली. 
 

करिअरमध्ये ७ कसोटी; यात सर्वाधिक ५ कसोटी विंडीजविरुद्ध : 
माधव आपटे यांनी १९५२ मध्ये कसोटी करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी पाकविरुद्ध सामन्यातून कसोटी करिअरला सुरुवात केली. त्यांनी करिअरमध्ये एकूण सात कसोटीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यातील सर्वाधिक पाच कसोटी सामने त्यांनी विंडीज संघाविरुद्ध खेळले हाेते. सुरुवातीच्या दाेन कसाेटी त्यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळल्या. 
 

सलामीवीर म्हणून गाजवले करिअर
माधव आपटे यांनी १९५२ ते ५३ च्या दरम्यान क्रिकेट करिअर गाजवले. त्यांच्या नावे सलामीवीराच्या भूमिकेत सर्वाधिक धावांची नोंद आहे. त्यांनी भारतीय संघाकडून कसोटी मालिकेत सलामीवीराच्या भूमिकेत सर्वाधिक धावा नोंद केल्या. एका टीमविरुद्ध कसोटी मालिकेत त्यांच्या नावे ४६० धावांची नोंद आहे. त्यांनी ही कामगिरी १९५३ मध्ये विंडीज दौऱ्यात केली होती. या पाच सामन्यांच्या मालिकेत आपटे यांनी सलामीला खेळताना एक शतक आणि अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या.

शिस्तबद्धपणामुळे अधिक प्रभावी   
माधव आपटे यांनी ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’चे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे बजावली. ते मुंबईचे नगरपालही होते. याशिवाय त्यांनी बीसीसीआयचे संस्थापक सदस्यपदही भूषवले हाेते. तसेच त्यांनी लेजंड क्लबचेही प्रमुखपद सांभाळले होते. यशस्वी उद्याेजक असलेले माधव आपटे हे मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्षही होते. 

बातम्या आणखी आहेत...