आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी महापौर आणि पतीसहित तिघांची घरात घुसून हत्या, पैशांच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई(तमिलनाडू)- अज्ञात हल्लेखोरांनी द्रमुकच्या माजी महापौर आणि त्यांच्या पतीसहित तिघांची घरात घुसून हत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी तिरुनलवेली शहरात घडली. उमा माहेश्वरी(61), पती मुरुग शंकरन(65) आणि मोलकरीन मारी(30) यांचे मृतदेह घरात सापडले. शरीरावर मारहाण आणि चाकूचे वार केल्याचे निशान आढळले. उमा यांनी 1996 मध्ये द्रमुकच्या तिकीटावर तिरुनलवेली नगर पालिकेची निवडणूक जिंकून पहिल्या महिला महापौर बनण्याचा मान मिळवला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर संध्याकाळी 4 वाजता घरात घुसले आणि दाम्पत्यावर हल्ला केला, यावेळी मोलकरीन मारी त्यांना वाचवण्यासाठी आली असता तिलाही मारले. उमा यांच्या मुलीनेच घरातील दृष्य पाहून पोलिसांना घटनेची सूचना दिली.


संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांच्या घरातील आलमारीदेखील तुटलेली होती. पोलिस कमिश्नर एन भास्करन यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी चाकू आणि लाठ्यांचा वापर केला. प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक स्पेशल टीम बनवण्यात आली आहे. यासोबतच फॉरेंसिक टीमने घटनास्थळावरुन काही महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. से कुछ अहम सबूत जुटाए हैं।