Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Former Union Home Minister Shinde comment about sanatan sanstha

तेव्हाच्या सीएमनी फोन केला असता तर लक्ष घातले असते; माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे

प्रतिनिधी | Update - Aug 22, 2018, 12:05 PM IST

सनातन संस्थेवरील बंदीबाबत मी केंद्रात गृहमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी थेट दूरध्वनी केला असता तरी त्यात लक्ष घ

  • Former Union Home Minister Shinde comment about sanatan sanstha

    सोलापूर- सनातन संस्थेवरील बंदीबाबत मी केंद्रात गृहमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी थेट दूरध्वनी केला असता तरी त्यात लक्ष घालता अाले असते, असा खुलासा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.


    दहशतवादविरोधी पथक व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने काही संशयितांना ताब्यात घेतले. त्या अटकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सनातन संस्थेवर बंदीची मागणी विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून होत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना सनातन संस्थेवर बंदीचा अहवाल केंद्रातील यूपीए सरकारडे दिला होता, त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना श्री. शिंदे म्हणाले, "मी २०१२ मध्ये केंद्रात गृहमंत्री झालो. माझ्या कार्यकाळात कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता. बंदीचा प्रस्ताव सन २००८ च्या दरम्यान दिलेला होता. गृहमंत्री असताना मला थेट दूरध्वनी केला असता तर, त्वरित दखल घेतली असती.

Trending