आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच राज्यांतील निकालानंतर भाजपविरोधी आघाडीच्या प्रक्रियेला वेग येईल; माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- देशाचे वातावरण बदल आहे. ज्या पद्धतीने भाजपने देशाला आश्वासित केले, ती सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही. त्याचे चटके भाजपला सातत्याने सोसावे लागतील. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील भाजपविरोधी आघाडीच्या प्रक्रियेला निश्चित वेग येईल, असा विश्वास माजी केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान माझी उमेदवारी मी कसा जाहीर करणार? पक्षच ठरवेल असेही ते म्हणाले. 

 

सातरस्ता येथील 'जनवास्तल्य'बंगल्यावर आयोजिलेल्या वार्तालापप्रसंगी माजी मंत्री शिंदे बोलत होते. सोलापूरसह, राज्य व राष्ट्रीय राजकारणातील घडामोडींवर त्यांनी दिलखुलास संवाद साधला. श्री. शिंदे म्हणाले, सध्या भारतीय जनता पार्टी व त्यांची सहयोगी पार्टी फक्त प्रसिद्धीच्या मागे आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त घोषणाबाजीच करतात. प्रत्यक्षात त्याचा सर्वसामान्यांना फायदा होण्याऐवजी त्रासच अधिक होतो. नोट बंदी निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य जनतेने ते अनुभवले. देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांनी नोटाबंदीमुळे देशाचे नुकसान झाल्याचे वक्तव्य केले. हा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर असून यापेक्षा आणखी कोणता मोठा पुरावा सत्ताधाऱ्यांना हवाय? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला

 

गैरप्रकारांवर पांघरून 
आमची सत्ता असताना एखाद्या मंत्र्यांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप झाले की आम्ही त्यांचे राजीनामे घेत होतो. केंद्रात व राज्यातही हीच भूमिका होती. त्यामुळे आमच्या पक्षात मोठे भ्रष्टाचारी आहेत, असे चित्र निर्माण झाले. त्याचा मोठा काँग्रेसला बसला. सत्ताधारी भाजपमधील मंत्र्यांचेकोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले, मात्र कोणावरही कारवाई नाही की कुणाकडून राजीनामे घेतले नाहीत. राफेलचा घोटाळा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे शिंदे म्हणाले. 

 

ताटात वाढलेलं खाता येईना.. 
सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रश्नांबाबत बोलताना शिंदे म्हणाले, मी केंद्रीयमंत्री असताना शहरासाठी कोट्यवधींचा निधी आणला. बससेवेसाठी वेगळा निधी दिला. टाकळी (दक्षिण सोलापूर) येथे बीएसएफ व हन्नूर (अक्कलकोट) येथे 'सीआरपीएफ'दल मंजूर केले. टाकळीतील काम बऱ्यापैकी पूर्णत्वास आले. पण, हन्नूर येथे अद्याप एक वीटही चढली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पंढरपूर, मंगळवेढा मार्गे विजापूर रेल्वेमार्गेच सर्वेक्षण झाले होते. पण, अद्याप त्याबाबत काहीच ठोस हालचाली नाहीत. सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे दोनदा भूमिपूजन झाले. हैदराबाद-सोलापूर रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. आमच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या कामांच्या माध्यमातून ताटात वाढलेले हे सत्ताधाऱ्यांना व्यवस्थित मार्गी लावता येत नाही.

 

सहकारमंत्र्यानी इतकी कामे केली की गुन्हे दाखल होऊ लागले 
सहकारमंत्री देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच मंत्री झाल्याचे सांगितले होते. त्यावर देशमुखांचा नामोल्लेख टाळत शिंदे म्हणाले, आम्ही फक्त विकासकामे केली. पण, माझ्यामुळे मंत्री झाल्याचे सांगणाऱ्यांचे सातत्याने प्रकरणे बाहेर पडत आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांवर गुन्हे दाखल होण्यापर्यंतची वेळ आली, असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करण्यात मी वेळ घालत नाही. मतदारांनी त्यांना विश्वासनाने पालिकेची सत्ता दिली. पण, सध्याचे त्यांच्यातील वातावरण पाहता, सूज्ञ मतदार निश्चितच भविष्यात योग्य निर्णय घेतील. 
 

बातम्या आणखी आहेत...