आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध माजी राष्ट्राध्यक्ष, माजी सीआए प्रमुख George HW Bush यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर जॉर्ज बुश अर्थात जॉर्ज एचडब्लू बुश यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबियांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. सीनिअर बुश हे जॉर्ज डब्लू बुश यांचे वडील होते. त्यांना शीत युद्ध संपविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी ओळखले जाते. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी आपल्या वडिलांबद्दल ही दुखद वार्ता शेअर करताना त्यांनी आपल्या कुटुंबियांसह समस्त देशवासियांच्या कल्याणाची कामना केली. अशा वडिलांच्या जाण्याने घरातील सगळेच शोकाकूल आहोत. एखाद्या मुलाला किंवा मुलीला हवे असलेले ते जगातील बेस्ट वडील होते अशी प्रतिक्रिया जारी केली.

 

CIA चे माजी प्रमुख, यांनीच केली होती New World Order ची घोषणा
सीनिअर बुश राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी एक अनुभवी फायटर पायलट होते. त्यांनी युद्धात मोठे योगदान दिले. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना सीआयएचे प्रमुख पद सुद्धा देण्यात आले होते. एकदा निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती. परंतु, 1992 मध्ये झालेल्या त्या निवडणुकीत डेमोक्रेटिक उमेदवार बिल क्लिंटन यांचा विजय झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्य असताना त्यांच्या परराष्ट्र धोरणांमध्ये दिसलेल्या दूरदृष्टीपणाचे आजही कौतुक केले जाते. त्यांच्याच नेतृत्वात इराकला कुवैतमधून हकलून लावण्यात आले होते. त्यांनीच जगात अमेरिकेच्या 'न्यू वर्ल्ड ऑर्डर'ची घोषणा केली होती.


सर्वात जास्त जगलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
सीनिअर बुश अमेरिकेचे सर्वात जास्त दिवस जगलेले माजी राष्ट्राध्यक्ष होते. 94 वर्षे जीवंत राहिलेले ते अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध माजी राष्ट्राध्यक्ष होते. यापूर्वी हा विक्रम माजी राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांच्या नावे होता. ते 93 वर्षे आणि 165 दिवस जगले होते. सीनिअर बुश यांनी त्यांचाही विक्रम मोडला होता. 

 

Statement by the 43rd President of the United States, George W. Bush, on the passing of his father this evening at the age 94. pic.twitter.com/oTiDq1cE7h

— Jim McGrath (@jgm41) December 1, 2018
बातम्या आणखी आहेत...