आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार काेटींमधून निवडलेले 100 गेमर फाेर्टनाइट वर्ल्डकप खेळणार; विजेत्याला विम्बल्डन चॅम्पियनपेक्षा अधिक बक्षीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क - जगातील सर्वात माेठ्या  ई-स्पोर्ट‌्स इव्हेंटला आज शनिवारपासून न्यूयाॅर्क येथे सुरुवात हाेत आहे. फाेर्टनाइट वर्ल्डकप नावाने या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. या स्पर्धेतील सहभागासाठी जगभरातील तब्बल चार काेटी चाहत्यांनी सहभाग नाेंदवला हाेता. मात्र, या क्वालिफायर्समधून अव्वल १०० गेमरची निवड करण्यात आली. यामध्ये १२ ते ४० वर्षांखालील खेळाडूंचा समावेश आहे. फाेर्टनाइट वर्ल्डकप हा जगात सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेला  ई-स्पोर्ट‌्स इव्हेंट आहे. यातील विजेत्यावर जवळपास २०० काेटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात येताे. यातील विजेत्या संघाला २१ काेटी रुपयांचे बक्षीस आणि ट्राॅफी देऊन गाैरवण्यात येते. विजेत्या संघाला मिळणारी ही रक्कम टेनिसमधील प्रतिष्ठित विम्बल्डन चॅम्पियनला मिळणाऱ्या बक्षिसापेक्षा अधिक असते. 


विम्बल्डनचा विजेता खेळाडू १९ काेटींचा मानकरी ठरताे. म्हणजेच १२ वर्षांचा  ई-स्पोर्ट‌्स इव्हेंटमधील चॅम्पियन हा एकाच वेळी याेकाेविक आणि हालेपपेक्षा अधिक बक्षिसांची कमाई करताे. त्यामुळेच या स्पर्धेला आता अधिक लाेकप्रियता लाभली आहे. यासाठी चार काेटी चाहत्यांनी पात्रता फेरीत सहभाग नाेंदवला हाेता. यातून फक्त १०० खेळाडूंची या पहिल्या विश्वचषकासाठी निवड झाली आहे. 


१५ वर्षीय बेंजी प्रबळ दावेदार, विजयानंतर घर खरेदी करण्याचा व्यक्त केला मानस 
इंग्लंडच्या संघाकडून या  ई-स्पोर्ट‌्स चा  विश्वविजेता हाेण्यासाठी १५ वर्षीय बेंजी हा प्रबळ दावेदार मानला जाताे. ताे बेंजीफिशी प्लेअर नावाचा गेम खेळताे. बेंजी हा वयाच्या ६ ते ७ व्या वर्षांपासून व्हिडिआे गेम खेळत आला आहे. यातूनच त्याला प्राेफेशनल खेळाडू मानले जाते. त्याने यात विजेता हाेण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे यातून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतून आलिशान घर खरेदी करण्याचा मानस या युवा खेळाडूने व्यक्त केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...