आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन इमारतींमधील जागेत आढळला तरुणीचा मृतदेह, डेड बॉडीची अवस्था पाहून खून झाल्याचा संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा(उत्तर प्रदेश)- येथे एका 18 वर्षीय तरुणीचा खून करुन मृतदेह दोन इमारतींच्यामध्ये अडकवण्यात आल्या धक्कादायक प्रकार समोर आला आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नोएडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.


नोएडाच्या सेक्टर 76 मध्ये आम्रपाली सिलिकॉन सिटी सोसायटीमध्ये दोन उंच इमारती आहेत. या दोन इमारतींमध्ये फक्त एक फूट अंतर आहे, त्यातच तरुणीचा मृतदेह आढळला. सोनामुनी असे या तरुणीचे नाव आहे. आम्रपाली सिलिकॉन सिटी सोसायटीमधील रहिवाशांना घाण वास आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी NDRF च्या टीमला बोलवून त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी 18 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये काम करत होती. मात्र 4 दिवसांपासून ती बेपत्ता होती. दरम्यान काल(2 जुलै) तिचा मृतदेह दोन इमारतींच्यामध्ये आढळला. त्यावेळी तिच्या मृतदेहाला पूर्णपणे केबलची वायर गुंडाळलेली होती. त्यामुळे हत्या करुन तिचा मृतदेह 18 व्या मजल्यावरुन फेकण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.