आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मानवलाेक’चे संस्थापक तथा ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. द्वारकादास लोहिया यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई -  येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोक संस्थेचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालिग्रामजी लोहिया (८१) यांचे शुक्रवारी रात्री १०.४५ वा. वृद्धापकाळाने निधन झाले. १२ दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर मानवलोकच्या मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात मुलगा प्रा. अभिजित लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरुंधती पाटील, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.  लाेहिया यांनी राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी संघटनांत राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घातली. सत्त्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची राज्याला अाेळख हाेती. 

 

> लोहिया यांचा अल्पपरिचय

- नाव - डॉ. द्वारकादास शालीग्राम लोहिया 

- जन्म दिनांक :  ७ सप्टेंबर १९३८
- शिक्षण - जी. सी.ए.एम. (मुंबई), हिंदी साहित्य विशारद
- संस्थेचे नाव - मानवलोक (मराठवाडा नवनिर्माण लोकायत)
- पद - कार्यवाह - प्रकल्पधारक 
प्राथमिक जबाबदाऱ्या - संस्थेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि प्रकल्पांचे नियोजन, संयोजन आणि आखणी करून त्या कार्यान्वित करणे. 

 

> इतर संस्थांवर  नियुक्ती 
केंद्र शासनाच्या भारत निर्माण या उपक्रमाचे बीड जिल्हा समितीचे उपाध्यक्ष.

- अवर्ष प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम महाराष्ट्र राज्य समितीचे सल्लागार सदस्य
- महाराष्ट राज्य जलसंधारण परिषदेचे सदस्य
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राज्य समिती सदस्य
- स्वयंसेवी संस्थांचा महासंघ (सी.एन.आर.आय) दिल्ली, सदस्य
राज्यस्तरीय रोजगार हमी योजनेचे माजी सदस्य
- जिल्हा अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम जिल्हा बीड, लातूर समिती सदस्य

-कृषी विभागाच्या आत्मा समितीचे कार्यकारी सदस्य
- जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समिती सदस्य

- बीड जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य
- जिल्हा कुटुंब नियोजन गुणवत्ता अभिवचन समिती सदस्य
- मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास अभ्यासक्रम समितीचे सल्लागार सदस्य. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, औरंगाबाद तज्ज्ञ सदस्य { डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माती आणि व्यवस्थापन या पदव्युत्तर अभ्यासक्रम समितीचे सल्लागार सदस्य.

- पंचायत पश्चिम भारत पंचायती राज मंचचे सदस्य समन्वयक (महाराष्ट्र, गुजरात, गोवा)

- राष्ट्रीय बालकामगार सल्लागार समिती जिल्हा बीडचे कार्यकारिणी सदस्य
- अपारंपरिक ऊर्जा स्रोत बीड जिल्हा समिती कार्यकारिणी सदस्य
- जनार्थ औरंगाबाद या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य
- ग्रामविकास परिषद मुंबईचे कार्यकारिणी सभासद { अफार्म, पुणे या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष
- जनाधार, पूस, ता. अंबाजोगाई या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष 
- भूमिका, येल्डा, ता. अंबाजोगाई स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य  { बीड जिल्हा ज्युदो संघटना अध्यक्ष 

 

पुरस्कार व सन्मान 
१९९१  बीबीसी इलेक्ट्रिक मोटार कंपनीच्या वतीने स्मृतिचिन्ह प्रदान
- १९९२ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अंबाजोगाईतर्फे सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह.
- १९९३ परिवर्तन संस्थेचा पद्मविभूषण अण्णासाहेब सहस्रबुद्धे पुरस्कार.

- १९९३ बीड जिल्हा परिषदेतर्फे २५ हजार रुपयांचे बक्षीस व सन्मानपत्र.

- १९९३ बीड जिल्हा परिषदेतर्फे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार.

- १९९४ कै. शंकरराव किर्लोस्कर प्रतिष्ठान, पुणेतर्फे विशेष कार्याबद्दल पुरस्कार.

- १९९४ विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठान, सेलूतर्फे उत्कृष्ट समाजसेवेबद्दल पुरस्कार.

- १९९३-९४ मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशन, औरंगाबादतर्फे पर्यावरण पुरस्कार.
- १९९८ यंग मेन्स गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजराततर्फे  मानवसेवा पुरस्कार
- २००० वामनराव ठाकूर स्मृती पुरस्कार { २००२  अंबाजोगाई नगर भूषण पुरस्कार. 
- विशेष कार्य : मराठवाडा विकास आंदोलन १९७२ चे दुष्काळ आंदोलन, अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग. या शिवाय भ्रष्टाचार विरोधी मोहीम, दुष्काळी परिस्थितीत हाताला काम पोटाला दाम, मंत्र्यांना गावात प्रवेशबंदी, भ्रष्ट पोलिसांना नजराणा कार्यक्रम इत्यादी प्रकारच्या कार्यात १९६२ ते १९७५ या काळात पुढाकार व नेतृत्व म्हणून अनेकदा तुरुंगवास. १९७५ च्या  आणीबाणीत १८ महिन्यांचा तुरुंगवास.

 

बातम्या आणखी आहेत...