National / CCD चे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता; तीन दिवसांपूर्वी एका पत्रात लिहिले होते, उद्योजक म्हणून मी अपयशी ठरलो!

शेवटच्या वेळी एका ब्रिजवर दिसले होते व्ही.जी. सिद्धार्थ, नदीकाठी शोध सुरू

दिव्य मराठी वेब

Jul 30,2019 11:56:02 AM IST

बंगळुरू - कॅफे कॉफी डे (CCD) चे संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता आहेत. ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने सिद्धार्थ यांना सोमवारी रात्री 9 वाजता मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या ब्रिजवर पाहिले होते. त्यांनी याच ब्रिजवरून उडी घेतली असा दावा निनावी व्यक्तीने केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मंगळुरू पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांच्यासह अनेक मान्यवरांनी एस.एम. कृष्णा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. सिद्धार्थ यांनी 1996 मध्ये बंगळुरूत पहिला कॅफे कॉफी डे सुरू केला होता. आज देशभर सीसीडीच्या शाखा आहेत. 27 जुलै रोजी सिद्धार्थ यांनी संचालक मंडळाला एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये आपण उद्योजक म्ङणून अपयशी ठरलो असे त्यांनी म्हटले होते.

नदीत उडी घेतल्याची शक्यता
सिद्धार्थ यांच्या ड्रायव्हरने सांगितले, की सिद्धार्थ उलाल पुलावर फेरफटका मारण्यासाठी पोहोचले होते. एका साईडला कार थांबवून त्यांनी पायी चालण्यास सुरुवात केली. ड्रायव्हर त्यांची कारमध्येच बसून वाट पाहत होता. दीड तासानंतरही ते परतलेच नाही, तेव्हा ड्रायव्हरने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी ड्रायव्हरच्या जबाबानुसार, सिद्धार्थ यांनी नदीत उडी घेतली असावी असा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर पोलिसांनी बचाव पथक आणि बोटींसह नदीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले.

पुढील स्लाइडवर वाचा, सिद्धार्थ यांनी लिहिलेले पत्र...

X
COMMENT