आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्झरी बसेस लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार आरोपींना अटक, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चालू बसची डिक्की उघडून सामान पळवण्याचा प्रयत्न फसला

देऊळगाव राजा- देऊळगाव राजा शहरापासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम टाकरखेड भागीले या परिसरामध्ये लक्झरी बसेस लुटण्याचा प्रयत्न दिनांक 6 फेब्रुवारी सकाळी साडेपाच वाजे दरम्यान घडला. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असून पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील चार सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेले आरोपी गजाआड केले असून यातील उर्वरित तीन आरोपी फरार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर-पुणे या महामार्गावर रात्रीच्या वेळेस लक्झरी बसेस चालतात. या लक्झरी बसेसमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न उस्मानाबाद जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगारांनी केला. यावेळी आरोपींनी वेगळीच शक्कल लढवून या गुन्ह्यामध्ये दोन ट्रकचा वापर केला. टाकरखेड जवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा वेग या ठिकाणी कमी होतो याची संधी साधून सदर गुन्‍हा करतांना आरोपींनी ट्रक क्रमांक (एम एच 12 केपी 58 71) तसेच ट्रक क्रमांक (एम एच 46 17 61) या दोन ट्रकचा वापर केला. यापैकी ट्रक क्रमांक (एमएच 12- 58 71) पोलिसांनी जप्त केली. 


सदर घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या लक्झरी बसेस तसेच इतर वाहनांचा वेग रस्त्याचे काम सुरू असल्याने मंद होतो, याचे कारण पाहून उस्मानाबाद जिल्ह्यातील खामकर वाडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद येथील आरोपी संतोष अर्जुन काळे (वय 24) धनाजी सुरेश शिंदे येरमाळा (वय 18) विकास कचरू चंदनशिवे (वय 28) राहणार शेलगाव तालुका कळम तर चौथा आरोपी संजय रामा काळे राहणार तेरखेडा तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद यांच्यासह इतर तीन साथीदारांनी या लूटमारीचा कट टाकून लक्झरी बसचा वेग कमी होताच गुन्ह्यात वापरलेल्या ट्रक मधून उतरून मास्टर किने लक्झरी बसच्या डिकी उघडून सुमारे सात ते आठ प्रवाशांच्या बॅग खाली टाकून पळविण्याचा प्रयत्न केला.


हा प्रकार लक्झरी बस क्रमांक (एम एच 14 सी डब्ल्यू 66 62) चा चालक योगेश नाना पाटील राहणार कोंडाडामळी जिल्हा नंदुरबार यांच्या लक्षात येताच टाकरखेड भागीले येथील काही सुज्ञ नागरिकाना सोबत घेऊन देऊळगाव मही येथील पोलिस चौकीला त्यांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आणि ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल काझी अशोक बुधवत केशव मुळे राजू मोरे पीएसआय मुळे विजय किटे शिवानंद केदार तुकाराम मोरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी सतीश काळे धनाजी शिंदे विकास चंदनशिवे संजय काळे या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले, तर त्यांच्यासोबत असलेले विकास संतोष शिंदे राहुल रामा काकडे सचिन शिवाजी शिंदे सर्व राहणार खामकरवाडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद हे ट्रक क्रमांक (एम एच 46 17 61) घेऊन फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेमुळे प्रवासी असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे तर या प्रकरणी अधिक तपास देऊळगाव राजा पोलिस करीत असले तरी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे

बातम्या आणखी आहेत...