आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीकाठी अंघोळ करताना वाहून गेली 4 मुले-मुली; शेतमजुरांनी दोघींना वाचवले, एका मुलासह चिमुकलीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील कोसी नदीत अंघोळीसाठी गेलेली 4 मुले अचानक आलेल्या तीव्र प्रवाहात वाहून गेली. त्याच ठिकाणी शेतात काम करणाऱ्या मजुरांनी पाहताक्षणी गावकऱ्यांना गोळा करून नदीत उडी घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने 2 जणांना वाचवण्यात यश आले. परंतु, इतर दोघांचा मृत्यू झाला. ते दोन्ही मृतदेह बाहेर काढून पोलिसांना कळवण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या मुलांपैकी एक सादिक (11) आणि दुसरी 9 वर्षांची मुलगी दरकशा होती. तर 10 वर्षीय शहनाज आणि 9 वर्षीय चांदनी या दुर्घटनेतून बचावल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


आपल्या आई वडिलांसोबत नदीकाठी असलेल्या शेतात 4 मुले-मुली मंगळवारी सकाळी गेले होते. नदी पाहून त्यांना मोह आवरला नाही आणि एक-एक करून चौघे नदीकाठी थोड्याशा पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरले. आपले आई-वडील शेतातच असल्याचे समजून ते अगदी निर्भिडपणे दरकशा, मो.सादिक, शहनाज आणि चांदनी नदीची मज्जा लुटत होते. त्याचवेळी अचानक नदीत तीव्र प्रवाह आला आणि चौघे वाहून गेले. शेतात काम करणाऱ्या एका महिलेने सर्वप्रथम त्या मुलांना वाहून जाताना पाहिले आणि एकच ओरड केली. शराफत आणि इतर गावकऱ्यांनी वेळीच नदीत उडी घेत दोन जणांना बचावले. परंतु, उर्वरीत दोघांना वाचवता आले नाही. काही वेळातच त्या दोघांचे मृतदेह सापडले.

बातम्या आणखी आहेत...