आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत चार देशांना वादळानंतर पूराचा तडाखा; १५३ जणांचा मृत्यू; एक कोटीपेक्षा जास्त लोकांना फटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क/हरारे/मापुतो/| आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत चार देशांत वादळानंतर आलेल्या पुरामुळे १ कोटींवर लोकांना फटका बसला आहे. आफ्रिकेत झिम्बाव्बे, मोझांबिक आणि मलावीत चार दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पुरामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत १५० लोकांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त नुकसान मोझांबिकच्या बीरा शहरात झाले. तेथे पूल कोसळले. तिकडे, अमेरिकेत शुक्रवारी आलेल्या वादळानंतर नेब्रास्कात ५२ वर्षांनी भीषण पूर आला आहे. पुरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

 

२६०० लोकांना एअरलिफ्ट केले
नेब्रास्कात धरण फुटल्याने दोन विभागात पूर आला आहे. लोकांनी छतावर जाऊन प्राण वाचवले. सोमवारपर्यंत २६०० लोकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केले. तिकडे नेब्रास्का हवाई दल तळ पुराच्या पाण्याने वेढला आहे. त्यामुळे धावपट्टी बंद करावी लागली.

 

>> आफ्रिकेत झिम्बाब्वे, मोझांबिक, मलावीत वादळ, पुराचा कहर
>> तिन्ही देशांत १५ लाखांना फटका,अशी आपत्ती प्रथमच आल्याचे मत

>> नेब्रास्कात ५२ वर्षांनंतर असा पूर, ४ नद्यांची पातळी वाढली
>> अमेरिकच्या १४ राज्यांत पूरस्थिती गंभीर होणार 

 

बातम्या आणखी आहेत...