Maharashtra Special / बुलडाण्यात कंटेनर आणि बोलेरोचा भीषण अपघात, औरंगाबादमधील एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू

गाडीचा संपूर्ण चुरा झाला असून मृतकाना जेसीबी मशीनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 03:54:00 PM IST

बुलडाणा- औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेहकर तालुक्यातील अंजनी फाट्यावर रात्री 1 वाजेच्या सुमारास बोलेरो आणि सिमेंट कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात बोलेरो गाडीमधील चालकासह चार जण जागीच ठार झाले. मृतक हे औरंगाबादचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात एवढा भीषण होता की कंटेनरने बोलेरो गाडीला 50 फुटाच्यावर ढकलत नेले. या अपघातात गाडीचा संपूर्ण चुरा झाला असून मृतकाना जेसीबी मशीनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले.


बोलेरो आणि सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघातात झाला. कन्नड येथील क्षीरसागर कुटुंबातील 3 जण ठार झालेत. त्यामध्ये वडील- मनोहर क्षिरसागर(वय70), मुलगी-मेघा मनोहर क्षिरसागर(वय35), पत्नी-नलीनी मनोहर क्षिरसागर(वय66) आणि बोलेरो चालक सुगदेव नागरे(वय-25) यांचा समावेश आहे. क्षीरसागर कुटुंब हे वाशीमला त्यांच्या मुलासाठी मुलगी पहायला गेलेची माहिती मिळत असून परत येतांना हा अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर, मृतांना जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पार्थिव मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हे मृतदेह ठेवण्यात आलेले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन 5 जनांचा मृत्यू झाला होता.

X
COMMENT