Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | four generations in one roof mantri family nagpur

आज जागतिक कुटुंब दिन...सारे मंत्री एका घरात, चार पिढ्या राहतात एकाच छताखाली

अतुल पेठकर | Update - May 15, 2019, 08:43 AM IST

नागपुरातील व्यापारी व उद्योजक रमेश मंत्री यांचे ४४ ते ४५ जणांचे कुटुंब आजही एकत्र राहते

  • four generations in one roof mantri family nagpur

    नागपूर - आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही आठ भाऊ, त्यांची १६ मुले, त्यांची बायका-मुले आणि सोळा भावांची मुले, सुना, नातवंडे असे एकूण साधारणत: ४४ ते ४५ जणांचे कुटुंब एकत्र राहते, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. नागपुरातील व्यापारी व उद्योजक रमेश मंत्री यांचे कुटुंब आजही एकत्र राहते. नागपुरातील शिवाजीनगर परिसरातील “मंत्री निवास’ सदैव गजबजलेले असते.


    नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव हे मंत्री कुटुंबीयांचे मूळ गाव. शेती हा पारंपरिक व्यवसाय. श्रीकिसन मंत्री यांना माणकलाल व शंकरलाल ही दोन मुले. यातील माणकलाल हे रमेश मंत्री यांचे वडील, तर शंकरलाल हे काका. श्रीकिसन यांनी आपल्या दोन्ही मुलांना नागपुरात शिक्षणासाठी पाठवले. काका शंकरलाल यांनी एलएलबी केले, तर वडील माणकलाल इंटरपर्यंत शिकले. इतवारी किराणा ओळीत दोन्ही भावांचे कुटुंबीय एकत्रच राहत होते. वकिली करायची नसल्याने शंकरलाल यांनी १९५६ मध्ये इतवारीत किराणा दुकान टाकले. त्यात यश आले आणि हाच मंत्री कुटुंबीयांचा व्यवसाय झाला. हळूहळू कुटुंब वाढत गेले. वडील आणि काकांना ८ मुले व ४ बहिणी यांच्यासह १६ जणांचे कुटुंब एकत्र राहत होते. कुटुंबासोबत व्यवसायाचाही विस्तार होत गेला. आज दाल मिल, सोलर पॅनेल निर्मिती, साॅफ्टवेअर निर्मिती, प्लास्टिक उद्योग असा परीघ विस्तारला आहे. प्रत्येक हाताला काम हे आमचे सूत्र असल्याचे रमेश मंत्री यांनी अभिमानाने सांगितले.

Trending