आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात डोळ्यांच्या डॉक्टरचा डोळाच काढला, आरोपींना 24 तासांत अटक

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कार अंगावर घातल्याचा जाब विचारणाऱ्या डॉक्टरवर चार जणांचा प्राणघातक हल्ला

पुणे- गाडीला कट मारला या किरकोळ कारणावरुन एका डॉक्टरावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला.  या हल्ल्यात सतिश वानखेडे हे गंभीर जखमी झाले आहेत तर पोलिसांनी आरोपी योगेश हाणमने, रितेश जाधव आणि अविनाश गायकवाड यांना अटक केले आहे.

शनिवारी पुणे विमानतळावर बहिणीला सोवून परत हडपसरकडे दुचाकिवरुन येणाऱ्या सतिश वानखेडे आणि अक्षय जाधव हे मुंढवा चौकातील रोडवरुन जात होते. यावेळी आचानक एक कार समोरुन अंगावर आली. त्या कारमधील आरोपींना डॉक्टर वानखेडे यांनी जाब विचारला. परंतु चिडून कारमधील चौघांनी दुचाकीवरील वानखेडे आणि जाधव यांचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि हॉटेल कल्टजवळ त्यांना अडवले. त्यानंतर गाडीतील चौघांनी सतिश वानखेडे यांना मारहाण करण्यस सुरवात केली. त्यापैकी एकाने धारधार शस्त्राने अंगावर, पाठीवर आणि डोळ्यावर वार केले.