आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार काडतुसं, देशी बनावटीच्या पिस्टलसह दोघांना केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- संशयीतरित्या फिरत असलेल्या २ व्यक्तींना पकडून त्यांच्या जवळून २ देशी बनावटीच्या पिस्टलसह ४ जिवंत काडतुसं आणि एक धारदार चाकू जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री दरम्यान शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या किरण पेट्रोल पंपाच्या परिसरात केली. 


सुरेंद्रमोहन नारायणराम मुंडा वय ४० रा. ह. मु. रांची, झारखंड आणि फिरोज खान जफरुल्ला खान ४० रा. पुसद रोड, उमरखेड असे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवारी रात्री शहरात गस्तीवर होते. या वेळी पांढरकवडा मार्गावर दोन व्यक्ती संशयीतरित्या फिरत असून त्यांच्याजवळ घातक अग्निशस्त्र असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यावरून या पथकाने पांढरकवडा मार्गावर जाऊन त्या ठिकाणी सापळा रचला. यात त्यांना दोन व्यक्ती संशयीतरित्या फिरताना आढळून आले. त्यावरून या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांजवळून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, एक पिस्टल कव्हर, ४ जिवंत काडतुसं, एक धारदार चाकू असा सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर या दोन्ही आरोपींना शहर पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...