आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिवाळ्यात शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि अस्थमा सारख्या समस्या होतात. हे टाळण्यासाठी रोजच्या दिनचर्येमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि अनेक आजारांपासून संरक्षण होईल.
व्हिटामिन सी वाढवणे
व्हिटामिन सी युक्त लिंबुवर्गीय फळे आणि भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करावा. या गोष्टीमुळे हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही आजारी पडणार नाहीत. यामुळे शरीराला अॅंटीऑक्सिडेंट्स मिळतात. जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. अशा प्रकारे भाज्या आणि फळे खाण्यापेक्षा त्यापासून तयार होणारे सुप किंवा ज्युसदेखील घेऊ शकता.
व्यायाम करणे
आपण नियमितपणे स्ट्रेचिंग, वेट लिफ्टिंग, जॉगिंग आणि वॉकिंग सारखे व्यायाम केल्याने शरीराची क्रियाशीलता वाढते. जर जिममध्ये जाणे शक्य नसेल तर घरीच सूर्यनमस्कार किंवा प्राणायाम सारखा योग करावा. ताण आणि चिंता टाळण्यासाठी दररोज ध्यान केल्याने फायदा होतो. अशाप्रकारे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल.
शांत झोपणे
रोग प्रतिकारशक्ती कायम राखण्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे आहे. लहान मुलांनी कमीतकमी ९ ते ११ तास झोप घ्यावी, चांगली झोप लागण्यासाठी झोपेच्या आगोदर टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप बंद करावेत. झोपण्याच्या आगोदर कोमट पाण्याने हात आणि तोंड धुतले पाहिजेत. दररोज ठरलेल्या वेळेत झोपल्याने शरीरावर काहीच परिणाम होणार नाही.
हात धुणे
थंडीत गार पाण्यात हात घालण्याचा अनेकांना कंटाळा येतो. मात्र, अनेक आजार टाळण्यासाठी हात धुणे आवश्यक आहे. हिवाळ्यात लाहान मुलांना गरम पाण्याने आणि अँटीबॅक्टेरियल साबणाने कमीत कमी २० ते ३० सेकंदांपर्यंत हात धुवून घ्यावेत. टॉयलेटमधून आल्यानंतर, तसेच जेवणाच्या आगोदर आणि नंतर हात धुणे गरजेचे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.