आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास कारने टँकरला मागील बाजूस धडक दिली. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील प्रवासी साताऱ्यावरून लग्नसमारंभ उरकून परत येत होते. मात्र, कार रसायनी पोलीस ठाण्याजवळ येताच कारने टँकरला जोरदार धडक दिली. यावेळी कार पूर्णपणे टँकरमध्ये घुसली होती. या कारमधून ६ प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस डेल्टा फोर्स घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.दरम्यान, मृताचे नातेवाईक आल्यावर अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटू शकते. याप्रकरणी अधिक तपास रसायनी पोलीस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...