आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात दोन अपघातांत चार ठार; माजलगावात 3, बीडमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - सोमवारी बीड जिल्ह्यात झालेल्या दोन अपघातांत चार जण ठार झाले. माजलगावात राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींच्या अपघातात तिघे ठार झाले तर बीड शहराजवळ टँकरच्या धडकेत  शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू राहिली आहे. बीड तालुक्यातील पेंडगाव येथील संदीप श्रीहरी काळकुटे (१६) हा दहावीला शिकणारा विद्यार्थी दुचाकीवरून (एमएच २३ के ९४८४) आपल्या शेतात चालला होता. धुळे - सोलापूर महामार्गावर नामलगाव फाटा परिसरात त्याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव टँकरने जोराची धडक दिली. या अपघातात संदीपचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. दुसरा अपघात माजलगाव शहरापासून काही अंतरावर घडला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात गणेश श्रीकिसन मिसाळ (वय ३०, रा. देवळा ता. सेलू जि.परभणी) यांच्यासह एक महिला व अन्य एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. उशिरापर्यंत त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. तर, शंकर जितू भोसले, अजित भोसले (रा. केकतपांगरी ता. गेवराई) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.