आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावात चार महिन्यांच्या बालकाचा होरपळून मृत्यू, अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागछाप येथील घटनेची पुनरावृत्ती टळली

मालेगाव- शहरातील अय्युबनगर भागात घराला लागलेल्या आगीत चार महिन्यांच्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी बारा वाजता घडली. अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.अय्युबनगरमध्ये राहणाऱ्या मोहंमद मोबीन यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरून अचानक धूर निघू लागला. या वेळी त्यांचा चार महिन्यांचा मुलगा मोहंमद अशान घरातच होता. तर पत्नी यास्मीन या बाहेर होत्या. घर लाकडी फळ्यांचे असल्याने आगीने राैद्ररूप धारण केले. अशान वरच्या मजल्यावर असल्याने त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर यास्मिन या जखमी झाल्या. आगीची माहिती मिळाल्याने अग्निशमन विभागाचे अधिकारी संजय पवार हे सात बंब व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आगीत दोन घरे जळून खाक झाली. शेजारील अब्दुल गफ्फार मोहंमद, मुशर्रफ आरिफ खान व मोहंमद इस्माईल मोहंमद मुस्तफा यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.अग्निशमन विभागाने तीन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे जवान शकील अहमद, मोहंमद साबीर, तुकाराम जाधव, युनूस खान, अमोल जाधव, जमील अहमद यांनी सहकार्य केले.

नागछाप येथील घटनेची पुनरावृत्ती टळली


शहरातील बहुतांश घरे लाकडी फळ्यांची बनली आहेत. अय्युबनगरमध्येही याच प्रकारच्या घरांचा समावेश आहे. अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवताना शेजारील घरांमधील गॅस सिलिंडर तातडीने बाहेर काढले. याकामी नागरिकांनीही सहकार्य केल्याने नागछाप झोपडपट्टीत लागलेल्या आगीची पुनरावृत्ती टळली.

बातम्या आणखी आहेत...