आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Four Months Later, The Sensex Jumped 917 Points In One Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार महिन्यांनंतर एका दिवसात मोठी उसळी, सेन्सेक्स ९१७ अंक वधारत बंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारातील बळकटी आणि कच्च्या तेलाच्या साैम्य किमतीमुळे देशाचा शेअर बाजार मंगळवारी गेल्या चार महिन्यांतील एका दिवसातील सर्वाधिक वृद्धीसह बंद झाला. सेन्सेक्स ९१७.०७ अंक(२.३०%) वाढून ४०,७८९.३८ वर बंद झाला. एनएसई निफ्टीत २७१.७५ अंका(२.३२%)ची वाढ राहिली. हा ११,९७९.६५ च्या पातळीवर बंद झाला. याआधी सेन्सेक्स गेल्या वर्षी २३ डिसेंबरला १,०७५.४१ अंक वाढून बंद झाला हाेता. ही सेन्सेक्सची आतापर्यतची सातवी सर्वांत माेठी वाढ आहे. देशांतर्गत बाजारात ही तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात बळकटी आणि क्रूडच्या किमतीतील साैम्यतेमुळे पाहायला मिळाली. याशिवाय जानेवारीदरम्यान देशात मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन जवळपास ८ वर्षांच्या उच्च पातळीवर पाेहाेचणेही चांगल्या वृत्ताच्या रूपात घेतले गेले. आयएचएस मार्केटचे मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जानेवारीत ५५.३ नाेंदले आहे.सेन्सेक्स बजेटच्या दिवशी झालेल्या नुकसानीची दाेन दिवसांत भरपाई

अर्थसंकल्पादिवशी सेन्सेक्स ९८७.९६ अंक बळकट झाला. गेल्या दाेन दिवसातील वृद्धीत हा १,०५३.८५ अंक बळकट झाला . याने बजेट दिवशी झालेल्या नुकसान भरपाई केली . दाेन दिवसांत समभागांचे मूल्य २.८६ लाख काेटी रु. वाढले.

बाजारातील तेजीची प्रमुख ४ कारणे 

  • १. क्रूड १३महिन्यांच्या नीचांकी स्तरावर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जानेवारी उच्च पातळीवरून २०% पर्यंत घसरून एका वर्षांच्या नीचांकी स्तरावर आले. ब्रेंट क्रूडची किंमत ५५ डाॅलर प्रति बॅरलवरून खाली येत ५३.९८ डाॅलर प्रति बॅरलचा स्तर स्पर्श केला. हा गेल्या १३ महिन्यांतील सर्वात नीचांकी स्तर आहे. काेराेना विषाणूमुळे चीनमध्ये जाण्या-येण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे तेथील कारखाने, कार्यालये, दुकाने बंद आहेत. चीन कच्च्या तेलाचा माेठा आयातदार आहे. सामान्य दिवशी येथे राेज १.४ काेटी बॅरल कच्च्या तेलाचा वापर हाेताे. मात्र, आत या आठवड्यात कच्च्या तेलाचा वापर २०% घटला आहे. चीन सरकारकडे मालकी असलेला आशियातील सर्वात तेलशुद्धीकरण प्रकल्प साइनाेपॅकने क्रूडच्या प्रक्रियेत राेज ६ लाख बॅरलची(१२%) कपात केली आहे.

  • २. लाभांश मिळण्याची आशा वाढली

डीडीटी समभागधारकांना द्यायचा आहे. यामुळे चालू आर्थिक वर्ष संपण्याआधी कंपन्यांद्वारे तो देऊ शकतात.

  • ३. डाॅलरच्या तुलनेत रुपयात बळकटी

रुपया डाॅलरच्या तुलनेत २९ पैसे बळकट हाेऊन ७१.०९ प्रति डाॅलरवर पाेहाेचला. यामुळे आयात  स्वस्त झाली.

  • ४. जगातील बाजारांत सेन्सेक्स वधारला

जगातील बाजारांत वसुली दिसली.आशिया-प्रशांत क्षेत्रात शांघाय कंपाेझिट १.३४%, हेंगसेंग १.२१%, निक्केई वधारला.