Crime / अमेरिकेत भारतीय कुटुंबाच्या 4 सदस्यांची गोळ्या झाडून हत्या, प्रत्येकावर एकापेक्षा अधिक गनशॉट

ठार झालेल्यांमध्ये एका मुलाचे वय 15 तर एकाचे 10 वर्षे आहे

दिव्य मराठी वेब

Jun 17,2019 11:07:00 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेत भारतीय वंशाच्या एकाच कुटुंबातील 4 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वेस्ट डेस लोवा प्रांतातील वेस्ट डेस मोइनेस शहरात राहणाऱ्या कुटुंबावर अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, शनिवारी हल्ला करण्यात आला. सीएनएनच्या वृत्तानुसार, या गोळीबारात मृत्यूमुखी पावलेल्या कुटुंबियांमध्ये 44 वर्षीय चंद्रशेखर शंकरा, 41 वर्षीय लावण्या आणि 15 व 10 वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत.


अमेरिकेतील मीडिया रिपोर्टनुसार, वेस्ट डेस मोइनेस शहरात राहणाऱ्या या कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह एका शेजाऱ्याला दिसून आले होते. त्यानेच पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. प्रत्येकाच्या शरीवार एकपेक्षा अधिक गनशॉट दिसून आले आहेत. अर्थात मारेकऱ्याने त्या सर्वांना ठार मारण्यासाठीच हल्ला केला होता असे दिसून येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून न्यायवैद्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्यांच्याच माध्यमातून मारेकऱ्याचा शोध घेतला जाईल. या प्रकरणात अनेक प्रश्ने अनुत्तरीत आहेत. त्या सर्वांचा शोध घेतला जाईल.

X
COMMENT