आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; नगर जिल्ह्यातील पारनेरची घटन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - आजारपणाला कंटाळून पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील शेतकरी कुटुंबातील चाैघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. बाबाजी विठ्ठल बढे (३७), कविता बाबाजी बढे (३३), आदित्य बाबाजी बढे (१५) आणि  धनंजय बाबाजी बढे (१२) अशी मृतांची नावे आहेत.

बाबाजीची चुलत बहीण रेखा गागरे या दूध आणण्यासाठी नेहमीप्रमाणे बाबाजीच्या घरी आल्या. बऱ्याच वेळा आवाज दिल्यानंतरही कुणीच दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांनी याबाबत पती सुभाष गागरे यांना दिली. सुभाष यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांना गळफास घेतलेला बाबाजी व अन्य तिघांचे मृतदेह दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

बाबाजीची पत्नी कविताला मानसिक आजार होता. ती नेहमी आजारी असे. थोरला मुलगा आदित्य अपंग होता. पत्नीचे आजारपण व मुलाच्या अपंगत्वामुळे या कुटुंबाला नैराश्य आले होते. गेल्या काही दिवसांपासून बाबाजी व कविता हे दोघे आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी चर्चा लोकांशी करत. मात्र, लाेकांनी त्यांच्याकडे दुर्लेक्ष केले.  बाबाजीची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती. पाच एकर बागायत जमीन व सहा दुभत्या गायी होत्या. चाळीस लिटर दूध व शेतीमध्ये बऱ्यापैकी मिळकत असूनही अपंग मुलगा व आजारी पत्नीमुळे बाबाजी सैरभैर झाला होता.

मुलगा धनंजय होता अभ्यासात अव्वल
 धाकटा धनंजय अतिशय हुशार होता. तो जवळा येथील धर्मनाथ विद्यालयात सातवीत शिकत होता. मुले झोपेत असतानाच त्यांच्याभोवती फास आवळला की सामूहिक आत्महत्या केली, याचा तपास पारनेर पोलिस करत अाहेत. मृतदेह पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

व्हिसेरा राखून ठेवला
चौघांच्या  आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. अन्नातून विषबाधा झाली किंवा नाही हे तपासण्यासाठी नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकास पाचारण करण्यात येऊन अन्नाचे नमुने घेण्यात आले. सायंकाळी चारही मृतदेहांवर कुकडी नदीकाठी  शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी पुढील तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत आहेत. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या याबाबतही गावात उलटसुलट दिवसभर  चर्चा सुरू होती.
 

जेवणातून गुंगीचे औषध दिल्याचा संशय
बाबाजी काही दिवसांपासून तणावाखाली होता. रविवारी शेतीची कामे उरकल्यानंतर त्याने गावातून मुले व पत्नीसाठी वडापाव आणले. रात्रीच्या जेवणासाठी मटकीची भाजी व भाकऱ्या केल्या. सर्व कुटुंब जेवले. बाबाजीने जेवणात किंवा वडापावमध्ये गुंगीचे औषध टाकून तिघांना बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांना फाशी दिली. नंतर स्वतः फाशी घेत जीवनयात्रा संपवली, असा पोलिसांचा तर्क आहे.  पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चिठ्ठी सापडते का याचाही शोध घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...