ACCIDENT: खासगी बस / ACCIDENT: खासगी बस आणि दुधाच्या टँकरचा भीषण अपघात, चार जणांचा जागेवर मृत्यू तर 19 जण जखमी

Feb 23,2019 04:37:00 PM IST

अहमदनगर- नगर-औरंगाबाद महामार्गावर कांगोणी फाट्याजवळ खासगी बस आणि दुधाच्या टँकरच्या भीषण अपघातात चौघांचा जागेवर मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले आहेत. जखमींवर अहमदनगरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, कांगोणी फाट्यााजवळ पहाटे तीन वाजेच्या रॉयल चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने दुधाच्या टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात चौघाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हलमधील 19 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचा अक्षरश: चुराडा झाला आहे.


संजय रामकृष्ण सावळे (वय-40, जि.बुलढाणा), आकाश सुरेश यांगड (वय-27, रा. खंडाळा, ता. चिखली, जि.बुलढाणा), कल्पेश गुलाबराव व्यवहारे (वय-22, रा. सारोखपीर ता. मौताळा, जि. बुलढाणा) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

X