Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Four people killed in a car-truck accident

कार-ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला

प्रतिनिधी | Update - Mar 18, 2019, 08:59 AM IST

मृतदेह बाहेर काढण्यासाठी लागला दीड तास 

 • Four people killed in a car-truck accident

  जामखेड | ट्रक-कारची जामखेड-नगर रस्त्यावर समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. शहरापासून १० किमी अंतरावरील पोखरी फाटा(ता. आष्टी, जि. बीड) येथे रविवारी पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये कारचालक नागेश चमकुरे, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे, अनिकेत चमकुरे, सर्व सावरगाव पिरजादे, ता. मुखेड, जि. नांदेड) अशा एकाच कुटुंबातील २ पुरुष, १ महिला व एका सातवर्षीय मुलाचा समावेश आहे.

  ट्रक व कारची जामखेड-नगर रस्त्यावर समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. शहरापासून १० किमी अंतरावरील पोखरी फाटा(ता. आष्टी, जि. बीड) येथे रविवारी पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये कारचालक नागेश चमकुरे (४०), योगेश चमकुरे (२९), अनुजा चमकुरे (आई, ४३), अनिकेत चमकुरे (मुलगा, ७ , सर्व सावरगाव पिरजादे, ता. मुखेड, जि. नांदेड) अशा एकाच कुटुंबातील दोन पुरुष, एक महिला व एका सातवर्षीय मुलाचा समावेश आहे. शंकर खुशाल चमकुरे (३७), खुशाल महादेव चमकुरे (५८), सुशीला खुशाल चमकुरे (५२), अरोही शंकर चमकुरे (१०) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  चमकुरे कुटुंब नांदेड जिल्ह्यातील सावरगाव पिरजादे गावचे मूळ रहिवासी आहे. नोकरीनिमित्त कुटुंबातील काही सदस्य गुजरातमधील उमरगावला वास्तव्यास आहेत. उमरगावला येथे खुशाल माधवराव चमकुरे हे शिलाई मशीनच्या कंपनीत काम करीत होते. ते आपल्या कुटुंबीयांसह सावरगाव पिरजादे येथे श्रीकृष्ण यात्रेसाठी १४ मार्च रोजी कारने आले होते. त्यांचा उच्चशिक्षित लहान मुलगा योगेश खुशाल चमकुरे याच्यासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही होता. यात्रा संपल्यानंतर चमकुरे कुटुंब शनिवारी रात्री गुजरातकडे निघाले होते. खुशाल चमकुरे यांच्यासोबत त्यांची पत्नी सुशीलाबाई खुशाल चमकुरे (५५), मुलगा शंकर खुशालराव चमकुरे (३५), सून अनुजा शंकर चमकुरे (३०), मुलगा योगेश खुशाल चमकुरे (२५), पुतण्या नागेश गोविंद चमकुरे (४०), नातू अनिकेत शंकर चमकुरे (७) हे सात जण होते. चमकुरे कुटुंबाची कार पोखरी फाट्याजवळ आली असता समोरून आलेल्या ट्रकची धडक झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. मृतांवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

  मृतदेह बाहेर काढण्यासाठी लागला दीड तास
  अपघात एवढा भीषण होता की आर्टिगा कारचा चालक स्टिअरिंग व सीटमध्ये अडकल्याने त्याचा मृतदेह काढण्यासाठी दीड तास लागला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले व जखमींना जामखेड येथील रुग्णालयात दाखल केले.

Trending